मध्यप्रदेशमधील अपघातात नामपुरचे तिघे ठार; मुलासह आई-वडिलांचा समावेश

0
धुळे । मध्यप्रदेशातील सेंधवा येथे झालेल्या कंटेनरने रिक्षाला दिलेल्या धडकेत पती- पत्नीसह मुलाचा जागीच मृत्यू झाला. आज (दि. 22) रोजी हा अपघात घडला. अपघातातील रिक्षा कंटेनरखाली दाबली गेल्याने तिघांचे मृतदेह क्रेनने बाहेर काढावे लागले.

या अपघातातील तिघेही मयत नाशिक जिल्ह्यातील नामपूर (ता. सटाणा) येथील रहिवाशी आहेत. अहिरे परिवारातील हे तिघेही सेंधव्यापासून जवळच असलेल्या खडकीया येथील एका आयुर्वेदीक दवाखान्यात उपचारासाठी आले होते.

याबाबत सेंधवा येथील बिसानन पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस आर.के. लौवंशी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नामपूर (ता.सटाणा) येथून सोमनाथ वेदुजी अहिरे, पत्नी ताराबाई सोमनाथ अहिरे आणि मुलगा नरेंद्र सोमनाथ अहिरे हे तिघेही आयुर्वेदीक उपचारासाठी आज सेंधव्यात आले होते.

खडकीया येथील आयुर्वेदीक रुग्णालयात रिक्षाने जात असतांना ए.बी. रोडवर मुंबईहून इंदुरकडे जाणार्‍या कंटेनरने (क्र.आर.जे.14 जीजी-4618) रिक्षाला (क्र.एम.पी. 45-0237) धडक दिली. यावेळी रिक्षा कंटेनरखाली रिक्षा दाबली गेली.

यात अहिरे परिवारातील सोमनाथ अहिरे, ताराबाई अहिरे आणि नरेंद्र अहिरे या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षाचालक आरिफ युसूफ हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हटविण्यात येवून मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने नामपूर गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

*