मनमाड-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघे ठार; खुनाचा संशय

0
मनमाड | भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने मोटार सायकलला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातात गंभीर  जखमी झालेल्या सविता चितळकर यांचा मालेगाव मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने अपघात मृतांची संख्या 4 झाली आहे. दुसरीकडे जुन्या वादातून हा अपघात घडवून आणल्याची शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव आहे.

हा अपघात मनमाड मालेगाव रोडवर घडला.  अपघातात संतोष चितळकर, आशा चितळकर आणि भूषण चितळकर हे तिघे जागीच ठार झाले असून सविता चितळकर व रोषण चितळकर गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी सविता चितळकर यांचा दुपारी रुग्णालयात मृत्यू झाला.

अपघातातील जखमींवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना मालेगावच्या रुग्णलयात पाठविण्यात आले. मयत आणि जखमी हे सर्व चितळकर या एकाच कुटुंबातील आहेत.

चितळकर कुटुंबीय हे मनमाडपासून जवळ बोयगाव येथील असून टँकर आणि चालक देखील याच गावातील आहे. सदर प्रकार हा जुन्या वादातून झाला असून पाळत ठेऊन अपघात करण्यात आल्याचा आरोप मयत चितळकर यांच्या नातेवाईकांनी केला असल्याने हा घात कि अपघात याबाबत अधिक समजू शकलेले नाही.

दरम्यान दुपारी  रुग्णालयात सविता बाईचा मृत्यू झाल्याचे कळताच चितळकर कुटुंबियांत शोककळा सोबतच  प्रचंड असंतोष पसरला असून टँकर चालकांने ठरवून घडविलेला हा अपघात नसून हत्याकांड आहे जो पर्यंत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला जात नाही तो पर्यन्त  मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत चितळकर यांच्या नातेवाईकानीं घेतल्या नंतर उपजिल्हा  रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.

त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

*