Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

‘माझा अगडबम’ मध्ये झळकणार सैराट फेम ‘लंगड्‍या’

Share

मुंबई : ‘परश्या आर्ची आली….’ अशी साद घालणाऱ्या लंगड्या प्रदीपची भूमिका जगभर गाजवणारा तानाजी गालगुंडे लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आगामी ‘माझा अगडबम’ या सिनेमाद्वारे तो पुन्हा एकदा झळकणार आहे. तृप्ती भोईर आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात तो ‘वजने’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘माझा अगडबम’च्या या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो.

तृप्ती भोईर आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात तो ‘वजने’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. दहा वर्षापूर्वी तुफान प्रसिद्धी मिळवणाऱ्या ‘अगडबम’ सिनेमाचा दमदार सिक्वेल असलेल्या  ‘माझा अगडबम’ सिनेमात तो नाजुकाच्या मित्राची भूमिका करताना दिसून येणार आहे. ‘पेन इंडिया कंपनी’चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत या सिनेमाचे लिखाण आणि दिग्दर्शन तृप्ती भोईरचेच आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात तानाजी ‘नाजूका’ बरोबर काय धम्माल करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘माझा अगडबम’ या सिनेमाचा हा पोस्टर लोकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. या सिनेमाच्या पोस्टरमुळे, ‘माझा अगडबम’ हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!