कान्स महोत्सवात रणबीरची एक्स गर्लफ्रेंड ठरली चर्चेचा विषय

0
मुंबई : काही दिवसांपूर्वी भारतीय अभिनेता ‘रणबीर कपूर’ आणि पाकिस्तानी अभिनेत्री ‘माहिरा खान’ यांच्या अफेअरच्या चर्चा जोरादार रंगू लागल्या होत्या. याबाबतची बातम्या मीडियावर झळकू लागल्याने दोघांना विचारणा केली असता दोघांनी प्रश्न उडवून लावले. परंतु रणबीरची एक्स माहिरा दुसऱ्याच गोष्टीसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानदेखील दाखल झाली होती. लॉरियाल पेरिस पाकिस्तानचं माहिरा प्रतिनिधित्व करतेय. या निमित्तानं माहिरा पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती.रेड कार्पेटवर माहिरा काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये सुंदरच दिसत होती. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या माहिरानं आपले काही फोटो शेअर केलेत. माहिरा पहिल्यांदाच कान्समध्ये सहभागी झाल्यानंतर खूपच आनंदी दिसली.

LEAVE A REPLY

*