महिंद्रा XUV 300 चे मुंबईत थाटात अनावरण; नाशिकमध्ये होणार उत्पादन

0

मुंबई (रवींद्र केडिया) | नाशिक येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत तयारी होत असलेल्या एक्सयुव्ही थ्री झीरो झीरो या कारचे आज थाटात मुंबईत अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, सीईओ पवन गोयंका, राजन वडेरा आदींसह मान्यवरांच्या उपस्थिती होती. एक्स यु व्ही फाईव्ह हंड्रेड नंतर एक्स यु व्ही 300 या वाहनाचे बाजारातील उपलब्धता चांगली असेल.

मोठ्या संख्येने ग्राहक या कारकडे आकर्षित होती अशी अशा याप्रसंगी आनंद महिंद्र यांनी व्यक्त केली. कारची गुणवत्ता व उच्चतम क्षमता असलेले इंजिन यामुळे मायलेजमध्ये इतर कारच्या दृष्टीने ही कार परवडेबल असेल असे बोलले जात आहे.

व्हिडीओ : रवींद्र केडिया, नाशिक

या कारमध्ये सात एअरबैग्ज, सनरूफ, LED प्रोजैक्टर हैडलैंप्स यासोबतच LED टेललैंप्स, 17 इंचाचे अलॉय व्हील्स यासारखे अनेक फीचर्स आहेत.

भारतात ही कार मारुतीची विटारा ब्रेज़ा आणि फोर्ड एकोस्पोर्ट या वाहनांच्या स्पर्धेत उतरणार आहे.

LEAVE A REPLY

*