Live Video : महिंद्रा ‘मराझ्झोचे’ नाशिकमध्ये सादरीकरण; अशी आहे किंमत

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक (प्रतिनिधी) ता. ३ : महिंद्राच्या बहुचर्चित ‘मराझ्झो’ कारचे आज नाशिकमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारंभात सादरीकरण करण्यात आले. आजपासूनच हे वाहन ग्राहकांसाठी बाजारपेठेत दाखल होणार आहे.

विविध व्हॅरिएंटमधील महिंद्रा मराझ्झोची किंमत ९ लाख ९९ हजार ते १३ लाख ९० हजार रुपयांपर्यंत  असल्याचे कंपनीने आज जाहीर केले आहे. इको ड्राइव्हिंग मोड, लेदर सीटस्‌, टचस्क्रीन एन्फोटेनमेंट सिस्टम अशा विविध सोयी सुविधा यात उपलब्ध आहेत.

नाशिक प्लँटवर संपन्न झालेल्या या सोहळ्यात महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा व व्यवस्थापकीय संचालक पवन गोएंका यांच्यासह कंपनीचे सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शार्क हा जास्त जगतो. चपळ असतो. तशीच ही कार असून जी आरामदायी आणि दीर्घकाळ टिकणारी आहे. म्हणून तिला शार्कचा आकार देण्यात आला आहे. सुरक्षा आणि आधुनिकतेचे सर्व सुविधा या वाहनात उपलब्ध असून कुटुंबासाठी ही एक परिपूर्ण कार आहे. तिच्यातून सात ते आठ व्यक्ती आरामात  प्रवास करू शकतात, असे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या प्रसंगी सांगितले.

नाशिक प्लँटवर मोठ्या अवकाशानंतर आनंद महिंद्रां यांच्या हस्ते नव्या वाहनाचे अनावरण होत असल्याने अधिकार्‍यांसह कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण होते. या समारंभासाठी विविध उत्पादन लाईन सोबतच कंपनी आवार व परिसराला सुशोभित करण्यात आले होते.

महिंद्र कंपनीच्या नाशिक प्लँटमध्ये बलेरो, झायले, स्कॉर्पिओ या उत्पादित होणार्‍या वाहनांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. नव्याने येऊ घातलेल्या इलेक्ट्रीक कार ‘इ-व्हेरीटो’चे उत्पादनही वेगाने सूरू आहे. त्या पार्श्वभूमीवर महिंद्राचे आगामी आकर्षण ठरणार्‍या या ‘मॅराझो’कार च्या रुपाने पून्हा एकदा महिंद्रा वाहन बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करु पहात आहे.

 

कंपनीत होणार्‍या या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही दिवस आधीच जय्यत तयारी सुरू होती. ‘मॅराझो’कार च्या अनावरण व सादीकरणासाठी भव्य मंच उभारण्यात आला होता. कंपनीचे अंतर्गत रस्ते व परिसरही सुशोभित करण्यात आले होते.

महिंद्र कंपनीचा नाशिक प्लँट हा अतिशय जूना प्लँट आहे. या ठिकाणी उत्पादीत वाहनांना मोठी बाजारपेठ मिळते अशी श्रद्धा उत्पादकांची आहे. कंपनीचे चेअरमन केशुभ महिंद्रांच्या हस्ते या नाशिक प्लँटचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यांचे नाशिक प्लँटवर विशेष प्रेम होते. गेल्या काही वर्षात नाशिक प्लॅटने लोकप्रिय उत्पादने दिलेली आहेत. त्यांच्या अनावरणाच्या निमित्ताने आनंद महिंद्र हे नाशिकला आले होते.

आनंद महिंद्रांच्या हस्ते स्कॅर्पिओ त्यानंतर लोगान चे अनावरण करण्यात आले होते. त्यापाठोपाठ झायलो च्या अनावरणाच्या निमित्ताने ते नाशिकला आले होते. 8 ते 10 वर्षांच्या मोठ्या अवकाशानंतर ते आज 3 सप्टेंबरला ‘मॅराझो’कार च्या अनावरणाच्या निमित्ताने नाशिकला आल्याने कामगार वर्गातही उत्साह दिसून आला.

अशी आहे मराझ्झो

शार्क माशाची बाह्यरचना समोर ठेवून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने ‘यू-321’ ही कार उत्पादित केली. तिचे नामकरण ’मॅराझो’ असे करण्यात आले आहे. उत्पादन सुरु असून 3 सप्टेंबर रोजी कार बाजारात येणार आहे. महिंद्रा डिझाइन स्टुडिओ आणि इटलीतील डिझाइन कंपनी पिनिनफरिना यांनी संयुक्तरित्या या कारचे डिझाइन तयार केले आहे.

या कारचा आकार, ठेवण ही शार्क माशासारखी असून, पुढील भागातील ग्रिल हे शार्कच्या दातांची आठवण करून देतात. टेल लॅम्पची ढबदेखील शार्कच्या शेपटीसारखी आहे. यातून कार अतिशय आक्रमक असल्याचे चित्र उभे करण्यात आले आहे.

या मॉडेलमध्ये अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि नवीन स्वरूपाची कलात्मकता आणण्यासाठी’एमएनएटीसी’मधील अभियंत्यांची जागतिक स्वरूपाची क्षमता तसेच ’एमआरव्ही’ मधील तज्ज्ञ पथकाचे कौशल्य हे महत्त्वपूर्ण ठरले आहे. अतिशय आरामशीर प्रवास, चपळपणा, भरपूर जागा आणि शांत केबिन अशी वैशिष्ट्ये असलेल्या ’मॅराझो’च्या बांधणीचे पेटंट घेण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

*