महिंद्राची नव्या ढंगातील स्कॉर्पिओ बाजारात दाखल

0
पुणे । भारतातील एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आज एसयूव्ही स्कॉर्पिओ नव्या ढंगात लाँच केली. ही गाडी भारतातील सर्व वितरकांकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या गाडीमध्ये सर्वात जास्त ताकद आणि टॉर्क, नवा 6 स्पीड ट्रान्समिशन, सुधारित कामगिरी, खास स्टायलिंग आणि आलिशान आरामदायी शीट आणि प्रशस्त जागा ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. गाडीची किंमत 9.69 लाख रुपये एवढी आहे.

यावेळी महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहन विभागाचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले, 2002 मध्ये लाँच झाल्यापासून स्कॉर्पिओने काळानुसार त्यात बदल केला आहे. आज जवळपास सहा लाख स्कॉर्पिओचे ग्राहक आहेत. आज नवीन ढंगातलाँच करण्यात आलेली स्कर्पिओ नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.
या गाडीत एमहॉक इंजिन बसवण्यात आले आहे.

जे 140 बीएचपीची जास्त ताकद आणि 320 एनएमचा जास्त टॉर्क देईल. गाडीमध्ये बसवण्यात आलेला बॉर्ग वॉर्नर, टर्बो चार्जर संपूर्ण ड्राइव्ह ग्राहकांचा आनंद द्विगुणीत करेल. एनव्हीएचमध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे केबिन अधिक प्रशस्त झाली आहे. गाडीचे नवीन आकर्षक बाह्य रूप तिला वेगळेपण देतांना दिसते. तसेच फॉक्स लेदरमुळे अंतर्गत सजावट जास्त स्टायलिश व हायफाय दिसणारआहे.

नवा पर्ल व्हाइट (फक्त एस 11 मध्ये), डायमंड व्हाइट (एस 11 खेरीज), नेपोली ब्लऍक, डी सॅट सिल्व्हर, मोल्टेन रेड आणि 6 प्रकार – एसथ्री, एसफाईव्ह, एससेव्हन (120 बीएचबी), एससेव्हन (140 बीएचपी), एस11 (140बीएचपी) आणि एस11 (140 बीएचपी 4 डब्ल्यूडीसह) असे वेगवेगळे रंग या गाडीसाठी साकारण्यात आले आहेत.

ही आहेत वैशिष्ट्ये : नवा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, नवा 1 टच लेन चेंज इंडिकेटर, नवी ऑटो विंडो रोल- अप, स्टॅटिक बेंडिंग तंत्रज्ञान असलेले प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, जीपीएस सह सहा इंची टच- स्क्रीन इन्फोटेनमेंट, गाडीतील हवामानावर नियंत्रण करण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा.

या प्रकारात आहे स्कार्पिओ उपलब्ध : एस थ्री, एस फाइव्ह, एससेव्हन (120 बीएचबी), एससेव्हन (140 बीएचपी), एस11 (140 बीएचपी) आणि एस11 (140 बीएचपी 4 डब्ल्यूडीसह) अशा सहा प्रकारांत उपलब्ध झाली आहे.

 

LEAVE A REPLY

*