महिंद्राची महाबोलेरो बाजारात दाखल; सतराशे किलो वजन वाहून नेण्याची क्षमता

0
नाशिक | दळणवळण क्षेत्रातील आघाडीचे पिक अप वाहन महिंद्राने नव्या ढंगात आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण करून पुन्हा एकदा बाजारात ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. महाबोलेरो असे या वाहनाचे नाव असून वाहनात सतराशे पेलोडची सर्वाधिक क्षमता आहे. त्यामुळे ग्राहक या वाहनाकडे आकर्षित होतील अशी आशा कंपनीला आहे.

या वाहनात एक रूंद अशा सहकारी चालकसोबतच संपूर्ण आरामदायी आसनव्यवस्था यात देण्यात आली आहे. ‘महा’ या नावाप्रमाणेच, नव्या बोलेरो पिक-अपमध्ये 9 फूट (2765 मिमी) – या क्षेणीतील सर्वाधिक लांबीचा अति-लांब कार्गो डेक उपलब्ध आहे.

या डेकमध्ये सतराशे किलो सर्वाधिक पेलोड वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच डबल बेअरिंग अॅक्सल, सक्षम 9-लीफ सस्पेन्शन व वजन वाहण्याच्या वाढीव क्षमतेला आधार मिळण्यासाठी 15 इंच, 12 पीआर टायर आहेत.

ट्विन टँडम बूस्टल एलएसपीव्ही ब्रेक्सदेखील आहेत. सक्षम बॉडी व चेसिस आहेत. नॅशनल परमिटद्वारे देशभर अवजड वजन वाहून नेण्यासाठी महाबोलेरो सक्षम असेल. वेगवेगळ्या बॉडी स्टाइल्स, कार्गो बॉक्स लेंथ आणि विविध ग्राहकश्रेणी व त्यांच्या गरजा यानुसार तेराशे, पंधराशे व सतराशे किलो पेलोड क्षमता देण्यात आल्या आहेत.  महाबोलेरोची किंमत ६ लाख ६६ हजार रुपयांपासून पुढे आहेत.

महाबोलेरोच्या अनावरप्रसंगी महिंद्रा अँड महिंद्राचे सेल्स व मार्केटिंग, ऑटोमोटिव्ह प्रमुख वीजय नाकरा म्हणाले, 20 वर्षांहून अधिक काळ आम्ही ग्राहकांच्या गरजा ओळखून तशी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. महा स्ट्राँग, महा बोलेरो पिक-अप द्वारे चांगला परतावा देऊ शकेल. तसेच वाहनाच्या देखभालीचा खर्चदेखील कमी येणार असून ग्राहकांच्या पसंतीला हे वाहन उतरणार आहे.

दोन वर्षे मोफत मेंटेनन्स

महा बोलेरो पिक अप वाहन ‘इंडिया का नं. 1 पिकअप का वादा योजना’ मध्ये उपलब्ध असून, ही योजना 2 वर्षे मोफत मेंटेनन्स व 4 वर्षांनी 4 लाख रुपये बायबॅक हमी देते. यामुळे ग्राहकांना याचा फायदाच होणार आहे.

LEAVE A REPLY

*