6 आसनी कार; डिजीटल फिचर्ससह ‘महिंद्रा’च्या केयूव्ही 100 कारचे सादरीकरण

0
मुंबई । महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा आपल्या आरामदायी आणि डिजीटल वैशिष्ट्यांनी परीपूर्ण असलेल्या केयूव्ही 100नेक्स्ट कारचे शानदार अनावरण केले. कंपनीने एसयूव्ही या आपल्या श्रेणीमध्ये अत्याधुनिक फिचर देत अवघ्या 21 महिन्यात केयूव्ही 100 नेक्स्ट उत्पादन बाजारात उतरवले असून ग्राहकाची पसंत आणि गरजा यांना सर्वोच्च प्राधान्य देणार्‍या या कारला प्रतिसाद मिळेल असा असा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका यांनी व्यक्त केला.

देशातील आघाडीची वाहन उत्पादन कंपनी असलेल्या ‘महिंद्रा’ उद्योग समुहाने आपल्या उत्पादनाचा विस्तार करत पूर्वीच्या एसयूव्ही श्रेणीला अत्याधुनिक डिजीटल वैशिष्टे देत केयूव्ही 100 नेक्स्ट या नव्या मॉडलचे सादरीकरण केले. डॉ. गोयंका यांनी कारची वैशिष्ट्ये नमूद करून म्हणाले, केयूव्ही 100 ने 4.5 ते 7.5 लाख रुपयांच्या दरम्यान किंमतीत एसयूव्हीमध्ये नवी श्रेणी निर्माण केली आहे.

याची वैशिष्ट्ये रचना याबाबत ग्राहकांचे समाधान होणार असून महिंद्राने नेहमीच आघाडीवर राहता येईल अशी उत्पादने निर्माण केली आहेत. आम्हाला आशा आहे नव्या वैशिष्टांनी सजलेल्या या कारला ग्राहक उत्तम प्रतिसाद देतील.

‘महिंद्रा’च्या ऑटोमेटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले, केयूव्ही 100 नेक्स्ट कारचे अनावरण करतांना आम्हाला आनंद होत आहे. आजच्या ग्राहकांना कारमध्ये प्रिमियमनेस, स्टाईल आणि हायटेक प्रणालीची अपेक्षा असते, ‘केयूव्ही 100’ या सर्व अपेक्षा पूर्ण करते.

यूव्ही कार श्रेणीच्या वाढीला ‘कॉम्पॅक्ट एसयूव्ही’ मुळे चालना मिळत असल्याचे बघता, पहिल्यांदाच कार घेणारे आणि कार मॉडेल अपग्रेड करणारे या दोघांच्या अपेक्षा केयूव्ही 100 पूर्ण करतील याबद्दल मला खात्री वाटते.

केयूव्ही 100 नेस्ट हे मॉडेल पुण्याच्या चाकण येथे तयार करण्यात आले ्रअसून पेट्रोल आणि डिझेल अशा प्रकारात उपलब्ध आहे. कार वाहन श्रेणीत पहिलेच फ्लेक्सी 6 व 5 आसन पर्याय असून त्यातील फ्लॅटफ्लोमुळे 6 प्र्रौढ व्यक्तींना बसण्यासाठी भरपूर लेगरुम आणि हेडरुम उपलब्ध आहे.

‘केयूव्ही वन डबल ओ’ ची वैशिष्टे : नवे आक्रमण फ्रंट ग्रील, फ्रंट आणि रिअर बंम्पर, नवे सनग्लास प्रेरित ड्युएल चेंबर हेडलॅम्प तसेच नवे मोठे 38.1 सेमी(15 इंची) डायमंड कट टोन अलाय, जीपीएस नेव्हिगेशनसह नवी 17.8 सेमी. टचस्क्रिन इनफोटेंटमेन्ट सिस्टिम, व्हाईस अलर्टसह नवी ड्राव्हवर इन्फॉमेशन सिस्टिम, इलेक्ट्रिनिक टेंम्पेरेचर कन्ट्रोल सिस्टिम, प्रिमीयम अंतर्भाग(स्पेस), स्पोर्टी ब्लॅक थीम, पियानो ब्लॅक इन्स्टटर्स, सुरेक्षेसाठी ड्युएल एअर बँगचा समावेश, ग्राहकांच्या पंसतीसाठी आठ आकर्षक रंगात के2, के2+, के 4+, के6+ आणि के8 मॉडल्स उपलब्ध.

LEAVE A REPLY

*