महिमा ससाणे पारी चित्रपटात पारूच्या भूमिकेत झळकणार

0

बक्तरपूर (वार्ताहर) – शेवगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील गरीब कुटुंबातील कु. महिमा श्याम ससाणे ही ‘पारी’ या मराठी चित्रपटात पारुच्या भूमिकेत झळकणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भातकुडगाव ता. शेवगाव येथील निर्माता/दिगदर्शक मारुती सापते यांनी सापते फिल्मस् निमिर्र्त पारी या मराठी चित्रपटाचे काम हाती घेतले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच भातकुडगाव व बक्तरपूर,शहरटाकळी परिसरात करण्यात येणार आहे. या चित्रपटात प्रसिद्ध कलाकार मोहन जोशी, नागेश भोसले, रवि पटवर्धन, विजय गोखले, प्रकाश धोत्रे, राजश्री गर्जे, सुरेखा कुडची, अश्विनी सरपुरे यांच्या भूमिका असणार आहेत. ग्रामीण भागातील एका खेड्यातील कु. महिमा ससाणे या मुलीला पारुची बाल कलाकारांची भूमिका करण्याची संधी मिळणार आहे. पारुच्या आईची भूमिका प्रभावती सत्रे करणार आहे. वडिलांची भूमिका प्रकाश धोत्रे पाहणार आहेत. बबलू ससाणे व बाल कलाकार म्हणून शिवम सापते काम करणार आहेत. नवोदित कलाकारांना निर्माता/दिग्दर्शक मारुती सापते यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

नवोदित कलाकारांचे सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष सुखदेव सामृत, माजी सरपंच नारायण फाटके, खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, ग्रामीण पत्रकार संघटनेचे सचिव शंकर मरकड, बक्तरपुरचे सरपंच राहुल बेडके, उपसरपंच आप्पासाहेब जाधव, सेवा सोसायटीचे अध्यक्ष बबन जाधव, उपाध्यक्ष हनुमान फाटके, माजी उपसरपंच भाऊसाहेब सामृत, भैरवनाथ पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, माजी अध्यक्ष मारुती सामृत, बाळासाहेब चोपडे, राजेंद्र फाटके, शंकर सामृत, आदिनाथ फाटके, देवटाकळीचे सरपंच ज्ञानदेव खरड, माजी सरपंच अशोक मेरड, भायगावचे माजी सरपंच राजेंद्र आढाव, अशोक दुकळे, अप्पासाहेब फटांगरे,युवा नेते राजेंद्र चव्हाण,अनिल ससाणे, श्याम ससाणे, अशोक नाबदे यांच्यासह परिसरातून कौतुक केले गेले आहे.

दिग्दर्शक मारुती सापते यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन जोशी, रवि पटवर्धन, राजश्री गर्जे यांच्या बरोबर मराठी चित्रपटात काम करण्याची जी संधी मिळाली ते मी माझे भाग्य समजते. मिळालेल्या संधीचे मी सोन करेन असा विश्वास कु. महिमा ससाणे हिने व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*