Type to search

हिट-चाट

महेश भट्ट यांनी कंगनाला फेकून मारली होती चप्पल

Share
मुंबई- हिंदी सिनेसृष्टीत येण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. चक्क महेश भट्ट यांनी सुरुवातीच्या काळात खडतर प्रवासानंतर आज लोकप्रियतेच्या या शिखरावर पोहोचलेल्या कंगनाला चप्पल फेकून मारली असल्याचा खळबळजनक खुलासा कंगनाची बहिण रंगोलीने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आलियाला कंगनाने चांगलेच टोले लगवायला सुरूवात केली आहे. आपल्या मुलीच्या बाजूने याच पार्श्वभूमीवर बोलत आलियाची आई सोनी राजदान यांनी कंगनाला महेश भट्ट यांनीच चित्रपटसृष्टीत संधी दिली, तरीही ती सतत आमच्या कुटुंबीयांवर टीका का करते हेच समजत नसल्याचे म्हटले. कंगनाची बहिण रंगोलीने सोनी राजदान यांच्या या ट्विटवर उत्तर देत खळबळजनक खुलासा केला.

प्रिय सोनीजी, कंगनाला ब्रेक महेश भट्ट यांनी नव्हे तर अनुराग बासू यांनी दिला आहे. या चित्रपटात महेश भट्ट केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. त्याच बरोबर त्यांच्या धोखा चित्रपटात काम करण्यास कंगनाने नकार दिल्यानंतर तिला संतापलेल्या महेश भट्ट यांनी बरेच काही सुनावले आणि महेश भट यांनी 19 वर्षांच्या कंगनाला लम्हेच्या प्रिव्यूदरम्यान चप्पल फेकून मारली होती. कंगनाला तिचाच चित्रपट त्यांनी पाहू दिला नव्हता. यानंतर माझी बहीण रात्रभर रडली होती, असे रंगोलीने पुढे म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!