Thursday, May 2, 2024
Homeब्लॉगवो,"माही वे"..! - आकाश दिपक महालपूरे

वो,”माही वे”..! – आकाश दिपक महालपूरे

धोनी..!धोनी..!!धोनी..!!!

हे तुझं नाव आता विजयाच्या रणांगणावर कधीच ऐकायला मिळणार नाही का..? खरचं अखेर ती वेळ आता संपली. काय लिहावं..सुचतचं नाहीयं..! तू आता मैदानावर “इंडियन” जर्सी मध्ये..कधी दिसणारचं नाही का..?

- Advertisement -

तुला सांगू…फक्त वनडे आणि टी-20 मधलं ‘ऑल टाईम ग्रेट’ क्रिक्रेटपटूचं नाव नव्हतं..तर तू एका वृत्तीचं नाव होतं. तू अनेक सदगुणाचं नाव होतं. तू भारतीय क्रिकेटच्या देदिप्यमान इतिहासातलं एक सोनेरी पान होतं. अगदी शंभर नंबरी सोनं, जे कधीही काळवंडणार नव्हतं.

खरं सांगू..तुझ्याकडून सदैव हिमालयाएवढ्या मोठ्या कामगिरीची अपेक्षा ठेवली जायची, पण तू आल्प्स पर्वताच्या उंचीचा परफॉर्मन्स दिला की ते अपयशं मानलं जायचं.पण यापुढं कुठलही तुझ्यारूपातलं ते “७” नंबरच यश किंवा अपयश या सोनेरी पानाच्या लखलखाटावर किंचतही दिसणार नाही.

तू तोच व्यक्ती आहे होता ना ज्याने जिंकण्याचं व्यसन लावलं होतं..,तू तोच व्यक्ती होता ना ज्याने सर्व ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केला होता.. तू तोच व्यक्ती होता ना ज्याने शेवटच्या 2 चेंडूवर 12 धावा हव्या असताना पण आपण जिंकू शकतोस हा आत्मविश्वास दिला होता..

तुला सांगू..तू आता गेल्यानंतर तुझ्या सारखा दुसरा फिनीशर होणार नाही..हे बोलण्यातचं आमचं अख्खं आयुष्य जाणार आहे.

पण एक गोष्ट लक्षात ठेव “माही”..तू आता “टीम इंडिया” मधून गेलायं तर कसं होईल हे माहीत नाही.. पण हा ‘आकाश’ फक्त तुझा फॅनच नाही तर तुझा दीवाना सुद्धा राहील..जेवढं त्यानं मुलीला मीस केल नसेल ना, तेवढ तो तूला आता मीस करेल..!

तुला सांगू.,यादीतली सर्व मंडळी मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरू, चंदीगडसारख्या मेट्रो शहरातली होती.इतरांबरोबरच्या शर्यतील तिथले खेळाडू आधीच शंभर मीटर्स पुढे होते. क्रिकेट तिथे वर्षानुवर्षे रुजवलं जात होतं. त्यांनी एका भव्य संस्कृतीच्या पाळण्यात जन्म घेतला होता आणि शिक्षणाची उपमा देऊन सांगायचं झालं तर, क्रिकेटच्या केंब्रिजमध्ये शिकलेली होती. खरतरं क्रिकेटची सुरूवात करतांना तूला या सोयी नव्हत्या.

मोठ्या शहरातल्या मंडळीमध्ये वावरताना लहान शहरातील मंडळी सुरूवातीला बुजतात. पण मला रांचीचा तु कधी बुजतांना दिसलाच नाही. इतरांपेक्षा शंभर मीटर्स मागे सुरूवात करून तू कॉन्ट्रीब्युशन च्या दृष्टीने वर उल्लेखिलेल्या क्रिकेटपटूंच्या पंगतीत तू बसला.

तुझी महत्वकांक्षा कधीच छोटी नव्हती. बघ ना..रेल्वे टीम सोबत खेळत असताना पहिली बॅट ही तुला तुझ्या मित्राने स्वतःच्या पैशातून विकत घेऊन दिली होती आणि एक जगजेत्त पर्व आता सुरु होणार होत..पण खरे आभार तर आपण त्या “बॅनर्जी सरांचे” मानायला हवेत. ज्यांनी तूला जाळीच्या पुढं चड्डी घालून उभ न करता ३ लाकडी दांड्यान मागं उभ केलं..

सुरुवातीला बिहार कडुन खेळताना ची गोष्ट आहे. बिहारच्या खेळाडूंना २००० सालच्या आसपास विचारलं गेलं,”तुमची क्रिकेटमधली महत्वकांक्षा काय ?”काही सांगूच शकले नाहीत. त्यावेळेस तू म्हणाला, “भारतासाठी विश्वचषक खेळताना मला षटकार मारून विश्वचषक जिंकायचाय!”

ठेवला विश्वास? म्हणजे तूझं ते मुंबईतलं २०११ साली षटकार मारून विश्वचषक जिंकून देणं हा योगायोग नव्हता, तर ते थंड डोक्याने अचूक सोडवलेले गणित होतं.

एकदा वर्तमान पत्रात कुठेतरी वाचलं होतं. श्रीनाथ म्हणाला होता,”महेंद्रसिंग धोनी हे नाव लक्षात ठेवा. तो मोठा होणार. त्याच्याईतका लांब चेंडू कुणीच मारत नाही. “त्यानंतर थोड्याचं वर्षात कळालं की, तुझ्याइतका जोरातही कुणी मारत नाही. भारतीय क्रिकेटच्या नव्या युगात सचिनने प्रथम एक वेगळीच आक्रमकता आणली. सेहवागने पुढे नेली आणि तू वनडेत ‘राक्षसी’ केली.

मला तर तूझा, तो डिसेंबर २००४ मधील मीरपूर बांगलादेशातील आगमनाचा दिवस आजही आठवतो लांब सडक केस, ५२ इंच छाती, हातात विजयाची तलवार, चालण अगदी कसलेल्या मातीतल्या पैलवाना सारखं., सगळं कसं रुबाबदार होतं.. पण लागलीच कसा सिलसिला.. पहिल्याचं चेंडूवर वर शून्यात धावबाद.. धक्काच बसला.विचार केला ‘हर जिरो की एक कहानी होती है’.. त्याच वेळेस वाटलं होतं..

आता खरा अध्याय सुरू होणार.. आणि तसचं झालं..पाकिस्तान दौऱ्यावर १४८ धावा.. आररर त्या ‘राना नावेदला’ लागोपाठ ३ षटकार ठोकले. तुला आठवतं श्रीलंका जयपूर १८३ “चामुंडा वासला” दोन खणखणीत कव्हरला खेचून नाकातला वास घ्यायला लावलास..

इंग्लंड-धर्मशाला १३८ तुझ्याकडून वाचावं म्हणून तो “एंडर्सन” पायावर यॉर्कर मारू लागला, पण “माही” तू त्याला विना टिकीट हेलिकॉप्टरमध्ये बसवून थेट बीरमींगहैँम ला सोडुन आलास.. काय पाहुणचार केला होता..

पण केवळ हाणामारी हे तुझ्या फलंदाजीचं रूप नव्हतं, तर ते कदाचीत बाह्यरुप असेलं, पण तुझं अंतरंग प्रचंड बुद्धीमानं होतं. तू एकेरी धाव अत्यंत कौशल्याने वेगात त्या धावेची जजमेंट घेऊन धावायचा. समोर जर चांगला पार्टनर असेल तर तू कधी तीनच्याऐवजी दोन किंवा दोनच्याऐवजी एकच धाव घेतलीय असं मला कधीच जाणवलं नाही.

वनडेतल्या डावातल्या आखणीच्या बाबतीत तर तुझा हात कुणीच धरू शकत नाही. पूर्वी स्ट्राईकरेट कधी वाढवायचा हे तुझं गणित १०० पैंकी ९६ वेळा बरोबर आलंय.एकेकाळी शेवटच्या षटकापर्यंत मॅच नेऊन मॅच संपवणं ही आइस्क्रीम खाण्याएवढी सोपी गोष्ट तू करून टाकायचा. जणूकाही देवाने तुला तुझ्यासाठी लिहिलेली पटकथा आधीच वाचून दाखवल्याप्रमाणे तू ‘शॉर्ट’ द्यायचा. काही फलंदाजांना पाहिल्यावर गोलंदाजांना धडकी भरते. त्यात तू एक होता. शेवटचं षटक टाकताना समोर जर तू असेल तर थंड असणारा गोलंदाजांना बर्फाचा पुतळा असू शकतो. माणूस नाही.

वडील नाही, तर आजोबांच्या अनुभवाने नातवांना बरोबर घेऊन फलंदाजी करायची आणि त्यांच्यातला कर्णधार बघता-बघता मोठं व्हायचं.२००७ च्या वर्ल्डकपमधल्या भारतीय संघाच्या अत्यंत मानहानिकारक पराभवानंतर सचिनने नेतृत्वासाठी तुझं नाव सुचवलं आणि तिथून तू भारतीय क्रिकेटला, वनडे असो किंवा कसोटी वरच्या पायरीवर नेऊन ठेवलं.

तुला सांगू,दहा-पंधरा वर्षाच्या काळात विकेट किपिंगचा एकही वाईट दिवस तू आमच्या वाट्याला येऊ दिला नाही..आज छत्तीस वर्षाच्या वयातही २२ कार्ड धावपट्टी पार करताना युसेन बोल्टलाही तू मागे टाकलं..

तुझे षटकार पाहतांना मैदानावरचं गवत सुखायचं, कारण गवतातून जाणारा फटका त्यांच्या अंगाची लाही-लाही करायचां.

तुझे ‘ग्लोव्हज’ प्रत्येक वेळी तरूण वाटत गेले. तुझी बॅट प्रत्येकी वेळी २०११ ची रूद्र अवतारी वाटत गेली. तुझा प्रत्येक चेंडू कीती विशालतेने पळायचा..नाही का!

अगदी आकाशातल्या विमानाला बघतो..तसा चाहतावर्ग त्याच्याकडे एकटक बघायचा. ‘दाढी वाढली म्हणून कुणी म्हतारा होत नसतो..तर डोक चालतं तोपर्यंत माणुस महान असतो’. हे तुचं शिकवलं होतं ना..तो एक बनायला तुला ते करावं लागलं.बाकीचे ते ९९ लोक करत नव्हते.

‘माही’..तु शेवटच्या षटकातला खेळाडू होतासं.चांगली सुरूवात करणारे खुप पाहिले..पण चांगला शेवट करणारा एकच ‘FINISHER’ तुझ्याचं रूपात या क्रिकेटच्या पलटावर बघितला. तुझ्या धैर्याची आणि बुद्धीची खरी परिक्षा झाली..तर ती तू वेळोवेळी घेतलेल्या निर्णयावरूनचं.! आणि त्याच वेळेस सिद्ध झालं आणि समजलं होतं.. सार्या जगताला तुझं असामान्यत्व नेतृत्व आणि कर्तृत्व..!

प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यत बहुदा सर्वांचाच आवडता खेळाडू तू झाला होता..कदाचित तुझा खेळ खराबही झाला असेल तरी तुला लोकांच्या टिकेचं धनी व्हावं लागलं.

पण खरचं किती भाग्यवान होतासं नाही का तू..!

‘धोनी’ चुकू शकतो यावर खरंतरं त्यांचा विश्वासचं नसायचा. बघना, तुझ्याइतकां विश्वासाचा उंबरठा क्रिकेट विश्वात कुणीच औळखला नाही.तुला नको असलेलं आयुष्य तु जगून सुद्धा पाहिलं..आणि तेच आयुष्य जगतांना जगाला तुझ्यावर हसतांनाही पाहिलं..आणि आज ते संपूर्ण जग तू तुझ्या कर्तृत्वावर जिंकलं..!

“खरचं ग्रेट मॅन आहेस तु”..!!तुझ्यासारखा शांत स्वभावाचा अन् साधेपणाचा माणुस मी आजवर पाहिला नाही..जो आज एवढ्या मोठ्या उंचीच्या शिखरावर उभा आहेस..तुझ्यासारखी बुद्दी क्रिकेटच्या मागे उभी राहत होती..तुझ्याइतकं क्रिकेटला कोणीच समजलं नव्हतं..कारण तू पहिल्या गेंदा पासून ते ३०० व्या गेंदा-पर्यंत मैदानावर मॅचला समजायचा.

तूचं होता ना तो, त्या ‘कोहलीला विराट’ बनवणारा..’म्हणूनच तर तो आजही म्हणतो “धौनी जैसा कोई नई”. खूप काही दिलस तू..! खूप काही शिकवलस तू..!! आपल्या ध्येयांवर प्रेम करायला सुद्धा शिकवलं तू..!!!

तुझी ती गोष्ट किती भावनाहीन होती..जेव्हा तू आॅस्ट्रोलियात होता आणि तुला मुलगी झाली होती..तेव्हा तू तिला चक्क ४० दिवसांनी बघितलं होतं..त्याचवेळेस तूला पत्रकारांनीही विचारलं सुद्धा होत,अस का केलसं ?..तेव्हा तू किती मार्मिक उत्तर दिल होतं..”नाही का.

आधी देश..! सगळ्या भावना ड्रेसिंग रूममध्ये सोडून द्यायच्या असतात.. खरचं किती कणखरं होतास ना तू. विराट,जडेजा, रैना, अश्विन, शमी, रहाणे हीच तर तुझी खरी इन्वेस्टमेंट होती. आणीबाणीच्या क्षणी तू तर चक्क सिनियर्स ला डावलून यांच्यावर विश्वास दाखवला होता.. किती किती टीका सहन केल्यास होत्या ना तू त्यावेळेस.पण चालत आलेल्या या इन्वेस्टमेंटचा रिफ्रेडेबल प्रॉफिटच क्रेडिट कधीच तू नाही घेतलसं.संघ हरला की तू संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्यायचा..पण जिंकल्यावर मात्र फ्रेम मध्ये कॉर्नरला दिसायचा.. कसं जमतं होतं रे तुला हे सर्व.

आज तिसऱ्या नंबर वर येऊन अधिराज्य गाजवणारा कोहली, ओपनिंग ची सुरुवात करायला तू संधी दिल्यास सोबत २ द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा, सहा षटकार ठोकणारा युवी पाजी, रैना-पांड्या सारखे फिनिशर, पूर्वी दहा दहा म्हटलं तरी तंतरणारी आपली बॉलिंग आज चार धावांची ही सहज मॅच जिंकवणारा “बुमराह”.. आणि नुसत्या क्षेत्ररक्षणाचाच्या जोरावर मॅच फिरवणारा “सर जडेजा”.. या सहकाऱ्यांच्या डोक्यावर सुद्धा तुझा परिस रुपी हात पडला होता आणि या पोरांनी अख्ख्या जगाचं सोनचं लुटलं होतं.

टेस्ट ची रिटायरमेंट अनाउन्स करण्याआधी रात्री एक वाजता तू “रैना” ला हॉटेल रूम मध्ये बोलावून घेतलं होतं आणि त्या व्हाईट जर्सीवर सेल्फी घ्यायला लावला होता.. त्या रैनाला काही समजायच्या आधीच तू म्हटला होता.. इथून पुढे मी कसोटी खेळणार नाही.. आणि तसाच त्या व्हाईट जर्सीवर झोपून गेला होता..

हरल्यावर सुद्धा इतरां सारख्या ब्याटा,ग्लोजेस तू कधी फेकल्या नाहीत

नेहमी शांतच राहिलास..आमच्या गल्लीतील क्रिकेट मध्ये एक जरी व्हाॅईट बॉल टाकला ना तरी अख्ख्या खांदानाचा उद्धार होतो.. “तू एवढा कसा कुल होता रे”.. ‘मी जेव्हा मरणाला टेकेल तेव्हा मला मोठ्या आवाजात “रवी शास्त्री” च्या कॉमेंट्री सोबत धोनी चा वर्ल्डकप विनिंग षटकार दाखवा..’ हे चक्क “सुनिल गावसकरांचे” बोल.. प्रिन्स ऑफ कोलकत्ता खूद्द दादा असे नेहमी म्हणायचा..” दुसरा ग्रिलख्रिस्ट नाही होऊ शकत..कारण तू पहिला “महेंद्रसिंग धोनी” झाला होता”..!

आजही तुझ्या त्या स्वप्नांनी मला जगायला शिकवलयं..चालयला शिकवलयं..ते हेच होतं ना,

( मी माझ्या बाबांना ग्राऊंडवर रोज इतरांपुढे हात झुकवतांना पाहिलयं, त्याच दिवशी मी ठरवलं होतं..याचं ग्राऊंडवर एक दिवस ज्या हातांनी माझ्या बाबांना झुकवलयं..त्याच हातांना माझ्या बाबांच नाव येताचं टाळ्या वाजतांना मला पहायचं..) कुठून आणला होता तो विजयाचा आत्मविश्वास..कुठून आणली होती ती जगण्याची ईच्छाशक्ती..कुठून आणलं होतं ते बापाचं स्वप्नं..नाही बघितला रे ‘माही’..तुझ्या इतका मोठा स्वप्नांचा प्रवासी..!

आणि आज साऱ्यांच्या मनावर राज्य करून निघून जातोयं..खरतरं,तुझ्या निश्चयाला जिद्दीची जोड होती.म्हणूनच नेहमी तुझ्या हातात विजयश्री होता! ‘अगर किसी चीज को पुरे दिल से चाहो,तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशीश मे लग जाती है’!!

खरचं.जिंकलय तू सारचं..!! तुझ्यापुढे नतमस्तक होतो…

खरतरं, तुझ्या सारख्या प्रचंड सहनशक्ती असणाऱ्या माणसाला पराभूत करणं खुप अवघडं होतं आणि शेवटपर्यंत राहीलही..!!

खरतरं तुझ्या निवृत्तीचा प्रश्न खुप दिवसांपासून ऐरणीवर होता..

पण मला असं नेहमी वाटायचं,ज्याला दुसऱ्याचे गुण-दोष कळतात त्याला स्वतःचं शरीरही कळत असावं.पण तुझं शरीर तुझ्याशी काय गुजगोष्टी करतं आहे ते तू जगाला सांगितलं पाहिजे असं नव्हतं.याचा अर्थ असाही नव्हे की, ज्यांना तुझी फलंदाजी मध्यमवयात आल्यासारखी वाटते ते त्यांनी बोलू नये किंवा लिहू नये.पण प्रत्येकाची इच्छा होती की, तुझा निर्णय स्वतः तू घ्यावा. कारण तुझ्या मॅच्युरिटीवर आपला पूर्ण विश्वास होता.तू उगाचचं रेंगाळणारा माणूस नव्हता. जागतिक स्टेज सोडणं सोपं नसतं.पण जेव्हा तू ते सोडलं तेव्हा तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला असा दिवस ठरला की, तुझ्यावर टीका करणाऱ्यांनाही हुंदका आवरता आला नाही.

पडद्यावरचा तुझ्यातला तो धोनी आयुष्यातून निघून जाणं आणि मैदानावरचा खरा तुझ्यातला धोनीही क्रिकेटमधून निघून जाणं,या दोन्ही गोष्टी लागोपाठ घडाव्यात हे खुप वेदनादायी ठरलं!

तुझ्यासारख्या महान खेळाडूचं असं अनपेक्षीत पणे बाद होणं,हे माझ्यासाठी नव्हे तर अख्या हिंदुस्थानासाठी खुप दु:खाची बाब आहे. असं मला

वाटतं..पण ज्या रणांगणावर हेलिकॉप्टर च्या षटकाने श्रीगणेशा झाला होता,त्याची सांगता पण त्याच मैदानावर हेलिकॉप्टरच्याच रूपाने व्हायला हवी होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या