30 हजारांपेक्षा अधिक थकबाकीसाठी 10 हप्ते : पाच समान हप्ते भरल्यास व्याज व दंड माफ होणार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत कृषिपंप ग्राहकांना सवलत देण्यात येणार आहे. याबाबतचा अध्यादेश काल जारी करण्यात आला. त्यानुसार मूळ थकबाकी 30 हजारांपेक्षा अधिक असल्यास ती 10 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड महिन्याच्या कालावधीत भरणा करणे बंधनकारक आहे.
त्यापेक्षा कमी थकबाकीसाठी 5 समान हप्ते प्रत्येक तीन महिन्यांच्या कालावधीत भरणा करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मार्च 2017 अखेर 37.64 लाख ग्राहकांकडे थबाकी असून त्यांच्याकडील व्याज व दंडाची रक्कम सुमारे 8382 कोटी आहे. या थकबाकीत सवलत देण्यासाठी सरकारने ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017’ सुरू केल्याचे जाहीर केले आहे.
या योजनेसाठी सर्व कृषिपंपधारक, उपसा जलसिंचन योजना पात्र आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एप्रिल 2017 पुढील त्रैमासिक चालू वीज देयके 7 नोव्हेंबरपूर्वी भरणे अनिवार्य आहे. ज्या प्रमाणात पाच समान हप्ते कृषिग्राहक वेळेवर भरतील, त्या प्रमाणात कृषिपंप ग्राहकांचे व्याज व दंड माफ करण्याबाबत शासनातर्फे विचार करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पाच समान त्रैमासिक हप्ते अनुक्रमे डिसेंबर 2017, मार्च 2018, जून 2018, सप्टेंबर 2018 व डिसेंबर 2018 अखेरीस भरणे आवश्यक राहील. या योजनत भाग घेण्यासाठी मार्च 2017 अखेरची मूळ थकबाकी 31 डिसेंबर 2018 पूर्वी दिलेल्या मुदतीत चालू देयकासह भरणे बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

*