‘रोहयो’ अधिकारी, कर्मचार्‍यांचे पगार रखडले

0

उपासमारीची वेळ : तीन महिन्यांपासून बिनपगारी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर राज्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवकांचे पगार रखडले आहेत. पगार नसल्याने या कर्मचार्‍यांना तीन महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. राज्य सरकारने तातडीने कर्मचार्‍यांचे पगार करावेत, अशी मागणी ग्रामरोजगार सेवकांमधून होत आहे.
जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेत अधिकारी, कर्मचारी, रोजगार सेवक आणि कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली असून जॉब कार्ड ते प्रत्येक गावात मागणीनुसार कामे उपलब्ध करून देण्यात येऊन ते पूर्ण करण्यासोबत रोजगार हमीवरील कर्मचार्‍यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे काम रोहयो यंत्रणेतील हे घटक पूर्ण करत आहेत.
मात्र, तीन महिन्यांपासून राज्यातील या कर्मचार्‍यांचे पगार थकीत आहेत. नगर जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांच्या आस्थापनेवर महिन्यांला 14 ते 15 तर ग्रामरोजगार सेवकांसाठी साधारण 70 लाख रुपये खर्च येत आहे. जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत 1 याप्रमाणे 3 हजार 315 ग्रामरोजगार सेवक कार्यरत असून त्यांना रोहयोच्या मजुराच्या टक्केवारीवर मानधन देण्यात येते.

LEAVE A REPLY

*