Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकची तरुणाई म्हणते, यशाची गुरुकिल्ली म्हणजे महात्मा गांधी

Share

नाशिक | देशदूत चमू 

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची आज जयंती. महात्मा गांधीजींची सत्य, अहिंसा, प्रेम ही मूल्ये आज अनेक वर्षांनंतरही समाजाला तितकीच लागू होतात. कोणतेही काम जिद्दीने केल्यास ते पूर्णत्वास जाते, हा त्यांचा विचार अनेकांना लढण्याचे प्रोत्साहन देतो. महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त तरुणाई आपल्या मतांद्वारे त्यांचे स्मरण करत आहे.

(संकलन : बागेश्री पारनेरकर, प्राजक्ता नागपुरे, जयश्री भामरे, प्राची कारळे, चैत्राली अढांगळे, पद्मिनी बोडके)

‘मोहनदास करमचंद गांधी’… शाळेत असताना 2 ऑक्टोबर ला भाषण देण्यासाठी लागणारी सर्व माहिती आम्हाला शिक्षकांकडून आणि पुस्तकातून दरवर्षी मिळत गेले पण हे कोणीच सांगू शकले नाहीत की ‘लाल बहादूर शास्त्री’ साठी का भाषणं नव्हते? आणि त्या मुळेच का होईना भारताचा ‘खरा स्वातंत्र्यविर’ हरवला! ह्या गुरू शिष्य जोडीने स्वातंत्र्य चळवळीत कॉंग्रेस मार्फत घेतलेला सक्रिय सहभाग विलक्षणच! “चले जाव” असेल किंवा “जय जवान जय किसान ” हिन्दुस्तानाला ईंग्रजाच्या जुलमातुन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि नविन राष्ट्राला विकसित करण्यासाठी सारखेच उपयोगाचे आहेत.

 • प्रतिश शिंदे

मला वाटतं की जो पर्यन्त क्रांती म्हणजे फक्त सशस्त्र, रक्तरंजीत असा समज राहील तो पर्यन्त आपल्याला गांधी समजणार नाही. जर तसे नसेल तर नथुरामाला क्रांतीकारी आणि गांधीना मजबूरी असे आपण समजलो.

 • अनिकेत पाटील

आज एवढी मुभा आपल्याला मिळाली असताना, आपण काय करतो आहोत. या निमित्ताने आज काही प्रश्न गांधीजींना विचारावेसे वाटतात. तुम्ही या लोकांसाठी जन्माला आला होतात का?. स्वतंत्र यासाठी आम्हाला दिलंय का? किंवा अगदी भ्रष्टाचार होताना जेव्हा त्याच नोटा वापरल्या जातात ही गोष्ट बघून तुम्हाला वाटतं ? याचा विचार आपण आपल्या मनाशी बोलून मिळवावा. म्हणूनच मतदान करताना, पैसे देताना, चुकीची कामं करताना माझा मनातला गांधी मला काय सांगतो याचं उत्तर घ्या मगच पाऊल उचला.

 • आदित्य देशमुख

महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे.  इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे…प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते, असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता. यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल. आणि खरंच आहे, गांधी पुन्हा होणे नाही.

 • मृणाल पाटील

महात्मा गांधी जेवढं कळणे सोपे तेवढेच अवघड. आज सोशल मीडियामुळे एका पोस्टला 200 लाईक्स आले तरी आपण खुश होतो , त्याकाळात यांनी लाखो लोकांची सोबत कशी मिळवली असेल, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बापू समजून घेतांना अनेक पुस्तकांचे वाचन झालेच पाहिजे. वैचारिक विरोध देखील अभ्यासात्मक असावा.जेव्हा जेव्हा आजही अशांततेचे वातावरण दिसले की बापूंची आठवण मला होते. त्यांच्या दूरदृष्टीचे विचार आजही किती महत्वाचे आहेत याची जाणीव सतत होत असते. ‘तुम्ही एखादे काम करतांना जेव्हा तुम्हाला खात्री पटेल की ती मदत त्या साखळीमधल्या शेवटच्या व्यक्तीला होईल, त्याचे पोट भरेल तेव्हा तुमच्यातील अहंकार गळून पडेल आणि तुम्ही योग्य दिशेने जात आहात’, त्यांच्या या तालीमचे विचार आणि कृतीतून स्मरण ठेवले पाहिजे.

 • प्रियंका सरवार

आज देश आर्थिक मंदीच्या वाटेवर असतांना, गांधीजींचा ‘खेड्यांकडे चला’ हा संदेश देशाला या परिस्थितीतुन वाचवणारा आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशातील लघुउद्योगांना प्राधान्य दिल्यास, सर्व प्रकारे स्वदेशीचा अवलंब केल्यास आर्थिक मंदीचे सावट नाहीसे होईल आणि देश जास्तीत जास्त स्वावलंबी होईल.

 • मनीषा पराते

आज जगभर हिंसेचे वातावरण पेटलेले आहे. हिंसा करण्यापेक्षा हिंसेचे समर्थन करणारे लोक सध्या वाढले आहेत. त्यामुळे गांधीजींच्या मूल्यांचा देशभर जागर होणे, ही काळाची गरज आहे. आणि यासाठी आपण भरतीयांनीच प्रयत्न करायला हवे.

 • मयुरी धामणे

महात्मा गांधीजी हे व्यक्ती नव्हे तर विचार आहे. त्यामुळे त्यांची व्यापकता अधिक आहे. १५० वर्ष टिकून राहिलेला हा विचाररूपी व्यक्ती भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे वैभव आहे.

 • नीरज दीक्षित

दिवसेंदिवस व्यसनाधीनता वाढत चाललेल्या या समाजाला आज बापूंच्या आरोग्यविषयक विचारांची आठवण करून देणे आवश्यक झाले आहे. गरजेपुरते खाणे, आहारात सात्विकता असणे युवापिढी सक्षम करण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.

 • निखिल सुतार.

देशाची गुरुकिल्ली म्हणजे बापुजी, देशाला स्वछता ही सेवा, मौन ,शांतता ही कोणत्याही गडबड भांडण या पेक्षा उत्तम पर्याय आहे. हे त्यांच्या जीवनशैलीतील एक उत्तम निर्णय.

 • गणेश सानप

आजच्या तरूण वर्गाला महात्मा गांधींच्या विचारांची गरज आहे.शांतता ,हिंसा, संरक्षण, ऐक्य ,महिलांना आत्मसन्मान ह्या विचारांची गरज आज तरुण व समजाला वर्गाला आहे.राजकीय नैतिकता ही गांधींच्या विचारांची महत्वाची बाब आहे,म्हणूनच आज गांधीजी नाही पण त्याचे विचार हे कायमचे समाजात राहिले पाहिजे

 • विशाल बागुल

मोहनदास करमचंद गांधी  भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

 • सागर बोडके

अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजींची यावर्षी १५० वी जयंती आपण साजरी करत आहोत. यानिमित्ताने संपूर्ण देशात स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. पण खरं म्हणजे गांधीजींचे विचार, मूल्ये ही एका दिवसापुरता मर्यादित न राहता ती रोजच्या आचरणात आणणं गरजेचे आहे, तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी करणाऱ्याला अर्थ आहे.

 • निहारिका देशपांडे

भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे.  महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते, असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता. यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल. त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्याबरोबर ते विचार आत्मसात करणं आवश्यक आहे.

 • मृणाल पाटील, बी.वाय.के.कॉलेज   

गांधी जयंतीपुरतं त्यांच्या विचारांचा, मूल्यांचा अभ्यास करण्याला काहीही अर्थ नाही. त्यांच्या विचारांचा, मूल्यांचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की ते खूप दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब अनेक देशांनी केला. पण सध्या अहिंसेच्या तत्त्वाची आपण व्याख्याच बदलली आहे. त्याकाळी त्यांनी ‘खेड्याकडे चला’, ‘खेड्यांचा विकास केला तरच भारताचा विकास होईल’, असे ते कायम म्हणायचे. यावरून त्यांची दूरदृष्टी कळते. आजच्या काळात तरुणांनी गांधी विचार समजून आत्मसात करणे गरजेचे आहे.

 • कमलेश काळे, विद्यार्थी

गांधीजी हे एक वेक्ती नव्हते तर एक तत्व एक विचार होते गांधीजी होते एक युग जाच्या नावाशिवाय भारतीय इतिहास हा पूर्णच होऊ शकणार नाही त्यांचा अन्यायाविरुद्ध प्रवास सुरु झाला तो दक्षिण आफ्रिका मधून आणि ते स्वातंत्र्या नंतर थांबले.
गांधीजी हे आपल्या देशासाठी एक दिपप्रज्वल म्हणून काम करून गेले त्यांनी नेहमी अखंड भारताचा विचार केला . हिंसेचा मार्ग सोडून अहिंसा चा मार्ग स्वीकारला .

 • शरद आहिरे. 

गांधीजी सत्य आणि अहिंसा ह्या दोन गुणांचे पूजक होते आणि ह्या गुणांची शिदोरी त्यांना श्रीमदभगवद्गीतेतून मिळाली.
गांधीजीनी त्यांच्या गुणांना प्रात्यक्षिकतेची जोड देऊन त्यांचे व्यक्तित्व फुलवले होते…आणि त्यामुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले गेले. बॅरिस्टर असून देखील स्वतःचे जीवन राष्ट्र कार्यात त्यांनी झोकले आणि अनेकांचे प्रेरणा स्थान म्हणून गांधीजी आजही विचारांच्या माध्यमातून वावरत आहे….

 • स्नेहा जोशी, उद्योजिका नाशिक

मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

 • रशमी शहापूरे

शांततेत किती ताकद असते हे महात्मा गांधीनी जगाला दाखवून दिले. अपमान झाल्यावर व्यक्ती आपल्या अस्तित्वासाठी लढा सुरू करतो. गांधीजींनी अहिंसेची शिकवण भारताला तसेच जगाला दिली. आजही महात्मा गांधीवर अनेक विनोदी पोस्ट शेअर केल्या जातात, हे दुर्दैव आहे. गांधीजींची हत्या करून जरी संपवण्यात आलं तरीही, त्यांची शिकवण आणि विचार यांच्या माध्यमातून ते आजही जिवंत आहे. बापूंवर एकतर प्रेम करू शकतो किंवा त्यांचा तिरस्कार, पण बापूंकडे टाळणं मात्र शक्य नाही. बापूंविषयी कितीही मतभेद असले तरीही बापूशिवाय पर्यायसुद्धा नाही…

 • पवन बोरस्ते

मूल्यांमधून विचार जन्माला येतात,  विचारांन मधून शब्द तयार हाेतात, त्यातून तुमच्या कृती तयार घडतात, कृतीमधून माणसांची व्यक्तीमत्वे घडतात. राष्ट्रिपता महात्मा गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

 • संदेश नंदकुमार कांबळे.

गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला आणि स्वत:पण याच तत्त्वांनुसार जगले. गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. गांधीजींनी म्हटले आहे की, सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. “परमेश्वर सत्य आहे.” असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते, “सत्य (हेच) परमेश्वर आहे.” असे बदलले.

 • मानसी खैरनार

गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार केला , स्वतः ही या तत्त्वानुसार जगले व दुसर्यांना जगायला शिकवले .
अश्या या राष्ट्रपित्यास माझा मानाचा मुजरा

 • गौरी कांबळे

2 आँक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून आपण जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करतो या दिवशी सार्वजनिक सुट्टी ही दिली जाते गांधीनी आयुष्य भर सत्य व अहिंसा या तत्वावर काम करणारे होते त्यांनी आपल्या भारतीय संस्कृती व धर्म यामध्ये ज्या काही समस्या असेल गुंतागुती च्या समस्यापासून आपण दूर असल्याची जाणीव ही त्यांनी आपल्याला करून दिली

 • श्वेता खोडे

प्रत्येकाला उमगलेले महात्मा गांधी वेगळे आहेत. त्यांचा विचारांकडे प्रत्येकजण कोणत्या नजरेतून पाहतो, तसे त्याला गांधीजी काळात जाता. कलाकार म्हणून गांधींच्या स्वदेशी चळवळीने माझ्यावर खूप प्रभाव निर्माण केला आहे कारण आज कॉंटेम्पोरारी आर्टच्या नांवावर काहीच्या काही होत चाल ये आणि जी आपली पारंपरिक कला आहे किंवा कला आस्वाद आहे तो पाश्चात्य होत चाल्ला आहे जे घातक आहे.

 • प्रा. द्विप रत्नाकर आहेर (कला इतिहासकार)

महात्मा गांधी ह्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला आयुष्यात चांगलेपणात ताकद असते आणि त्या चांगलेपणातून जग जिंकता येत हे उमजून सांगितलं. तर दुसरीकडे शांततेच जीवनातील महत्व जाणवून दिल.

 • तेजश्री गोडसे
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!