हर हर महादेव… शिवायलांत भक्तांचा मेळा

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – महाशिवरात्री निमित्त नगर शहरात विविध महादेव मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. पहाटे महाअभिषेक, पूजा, महाआरती तसेच विविध ट्रस्ट, संघटना, संस्था व मंडळाच्यावतीने महाप्रसाद, ङ्गळांचे वाटप करण्यात आले. हार,ङ्गुले, बेलाची पाने आदिंची दुकाने मंदिर परिसरात थाटली होती. अनेक मंदिरात धार्मिक कार्यबरोबरच किर्तनकारांची किर्तने, प्रवचनकारांची प्रवचने सुरू आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त तोफखाना परिसरातील सिध्देश्‍वर मंदिर, माळीवाडा येथील श्री कपिलेश्‍वर मंदिर, ओंकारेश्‍वर मंदिर, बुर्‍हाणनगर रोडवरील बेलेश्‍वर मंदिर, बाणेश्‍वर मंदिर, अर्बन बँक चौकातील अमृतेश्‍वर मंदिर, स्टेट बँक चौकातील विजय शंकर मंदिर,  भिंगार येथील शुकलेक्शवर, ङ्गुलसौदर मळा येथील पंचायतन मंदिरासह शहरातील शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

तसेच माळीवाडा रिक्षा स्टॉप, माळीवाडा तरुण मंडळ व गणपतीची तालिम यांच्यावतीने भव्य शंकराची मूर्ती मुख्य चौकात सजविण्यात आलेल्या स्टेजवर ठेवण्यात आली. तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य शंकराची मुर्तीची आरती श्री विशाल गणेश मंदिरचे पूजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी पदाधिकारी व भाविक आदी उपस्थित होते.

यावेळी बुर्‍हाणनगर रोडवरील बेल्हेश्‍वर मंदिर, नगर शहरातील सिद्धीबागेतील सिद्धेश्‍वर मंदिर तसेच महादेव मंदिरे रात्री विद्युत रोषणाई, पतकांनी उजाळून निघाले.

 

LEAVE A REPLY

*