Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

महाशिवआघाडीचे नेते राजभवनात दाखल; स्पष्ट बहुमत असल्याचा दावा

Share
अखेर ठाकरे सरकारचे खाते वाटप जाहीर; इथे पहा संपूर्ण यादी Latest Mumbai list Cabinet Extension Mahavikas Aghadi Government Announced

मुंबई | प्रतिनिधी

महाशिवआघाडीचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, विनायक राऊत हे आज सकाळी राजभवनात दाखल झाले. महाशिवआघाडीला स्पष्ट बहुमत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत असून तसे पत्रही त्यांनी राज्यपालांना देण्यासाठी आणले आहे. नेते राज्यपालांची वाट राजभवनात पाहत आहेत.

दरम्यान, विद्यमान सरकारला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी केली आहे. अजित दादांचे बंड मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसलेली दिसून येत आहे.

शिवसेनेच्या ६३, राष्ट्रवादीच्या ५३ आणि काँग्रेसच्या ४४ आमदारांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या घेण्यात आल्यामुळे अजित पवार एकटे पडलेले दिसून येत आहेत.

महाशिवआघाडी नव्या सरकारस्थापनेसाठी सज्ज असून तीन पक्षांच्या आमदारांच्या सह्या प्रतिज्ञापत्रावर आहेत. या सह्यांचे पत्रदेखील आज सुप्रीम कोर्टात सादर करण्यात येणार आहे. महाशिवआघाडीच्या भूमिकेमुळे फडणवीस सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!