Type to search

Breaking News Featured क्रीडा जळगाव मुख्य बातम्या

महाराष्ट्र केसरी बाला रफीक ठरला खान्देश केसरीचा मानकरी : दोन लाख ५१ हजाराचे बक्षीस

Share

धरणगावात रंगल्या कुस्त्या : २५ हजारांवर उपस्थिती

धरणगाव (प्रतिनिधी) –

येथील मरीआई यात्रोत्सव निमित्ताने दि.२७ रोजी “खान्देश केसरी” कुस्तीसाठी राष्ट्रीय स्तरावरील मल्लांची जोड निश्चित करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेला मल्ल बाला रफीक (सोलापूर) याने भारत केसरी किताब पटकावलेला तेजवीर पुनिया (हरियाणा) या राष्ट्रीय खेळाडूला रोमहर्षक लढतीत चीत केले.

या विजयाने आखाड्यात जल्लोष झाला. विजयी मल्ल बाला रफीक यांना दोन लाख ५१ हजाराचे रोख बक्षीस खान्देश केसरी किताब पट्टा व गदा सन्मानपूर्वक मंत्री गुलाबराव पाटील व मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

आखाडा पूजन व मानाची जोड शुभारंभ सहकार राज्यमंञी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज वाणी, सरपंच भगवान महाजन, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, सुरेश चौधरी, जीवनसिंह बयस, भैय्या महाजन, अविनाश पाटील, अनिल पाटील, प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे, माजी नगराध्यक्षा उषा वाघ, तहसिलदार मिलींद कुलथे, पो.नि.पवन देसले, हनुमंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष भानुदास विसावे, सेक्रेटरी, प्रशांत वाणी, सह.सेक्रेटरी विलास येवले, खजिनदार कमलेश तिवारी व संचालकांनी केले. मान्यवरांच्या हस्ते कुस्त्यांची जोड लावण्यात आली.

या मल्लांनी गाजवला आखाडा

धरणगावच्या खुल्या कुस्ती स्पर्धेत २५० च्या वर मल्लांनी सहभाग नोंदविला त्यात किसन पुनिया (हरियाणा), प्रवीण जाधव (धुळे) सुनिल भिल (धुळे), पुजा तायडे (धुळे), साक्षी शिंदे (धुळे) ज्योती यादव (एरंडोल), महन पहेलवान (धरणगाव) यांच्यासह मनमाड, परप्रांतीय मल्लांनी आखाडा गाजवला.

याप्रसंगी महिलांच्या कुस्त्याही रंगत

दार झाल्या. पंच म्हणून भानुदास विसावे, प्रकाश पाटील, देविदास महाजन, गुरु वैदू, किशोर महाजन, अरुण कासार यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी संचालक गोपाळ पाटील, भास्कर मराठे, शरद भोई, सुनिल चौधरी, डॉ.व्ही.आर.तिवारी, डॉ.किशोर भावे व सर्व संचालक मंडळाने परिश्रम घेतले. खुल्या कुस्ती स्पर्धेत २५० कुस्त्या झाल्या. खान्देशातून कुस्ती प्रेमींनी कुस्त्या पाहण्यासाठी भरगच्च गर्दी केली होती.

अशीही रसिकता

सहकार राज्यमंत्री यांनी खान्देश केसरीला एक लाख रु. चा पुरस्कार दिला. तर कार्यक्रमात उपस्थित माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी हजारो रुपये वाटले. प्रत्येक विजयी मल्लाला ते रोख बक्षिसं देत होते. त्यामुळे विजयी झालेला प्रत्येक मल्ल त्यांना आवर्जून भेटायला येत होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!