Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

#ShivsenacheatsMaharashtra ला #MaharashtraWithShivsena चे उत्तर; हॅशटॅग ‘हिट’

Share

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला असताना शिवसेना समर्थक विरुद्ध भाजप समर्थक यांच्यातही ट्विटरवर वाकयुद्ध रंगले आहे. सध्या ट्विटरवर शरद पवार यांच्यासह #ShivsenacheatsMaharashtra व #MaharashtraWithShivsena हे  हॅशटॅग ‘हिट’ झाले आहेत.

विधानसभेचा निकाल लागल्यापासून सत्ता स्थापनेविषयी खलबतं सुरू आहेत. शिवसेना भाजपचा वाद टोकाला गेल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच जास्त वाढला आहे. राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार यावर सगळीकडे चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावरही राज्यातील राजकीय स्थितीवर नेटीझन्सकडून भाष्य केलं जात आहे. यातच आता शिवसेना सोबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सत्ता स्थापन करतील अशा चर्चांना उधान आल्यामुळे हे हॅशटॅग ‘हिट’ झाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापन करता आलेली नाही. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरदेखील शिवसेनेची साथ असल्याशिवया सरकार स्थापन करणे त्यांच्यासाठी अशक्य झालेली परिस्थिती आहे.

आज सकाळी रंगलेल्या सत्तानाट्यातील प्रमुख हालचालीवर ट्विटरवर संभाषण होताना दिसत आहे. ट्विटरवर #ShivsenaCheatsMaharashtra असा हॅशटॅग ट्रेंड झाला तर दुसरीकडे #ShivsenacheatsMaharashtra हा ट्रेंडमध्ये येऊन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!