नारायण राणेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’

उद्यापासून राणे महाराष्ट्र दौऱ्यावर

0

सिंधुदुर्ग :  घटस्थापनेच्या मुहूर्तावर नारायण राणेंनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. चार वेळा मुख्यमंत्रिपद देऊ असा शब्द देऊनही कॉंग्रेसने शेवटपर्यंत मुख्यमंत्रिपदाची पदापासून दूर ठेवले.

त्यामुळे तुम्ही काय? माझी हकालपट्टी काय करणार, मीच काँग्रेसला राजीनामा देतो, असे सांगत कॉग्रेसला राजीनामा दिला.

तसेच, विधान परिषदेच्या आमदारकीपदाचा ही  राजीनामा दिला.

गेल्या अनेक दिवसांपासून राणे कॉंग्रेस सोडणार ही राजकीय वर्तुळात चर्चा होती  ती आज पूर्ण झाली. मात्र राणे आता कोणत्या पक्षात पक्ष प्रवेश करता हे स्पष्ट केले नाही.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा बट्याबोळ केला असा आरोप राणेंनी केला.

उद्यापासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. नागपूरपासून माझ्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे, असे राणे यांनी यावेळी जाहीर केले.

LEAVE A REPLY

*