Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

युवक कॉंग्रेस टिकटॉकद्वारे साकारणार महाराष्ट्राच्या विकास कल्पना

Share

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ४५ दिवसांचे ‘वेक अप महाराष्ट्र’ हे अभियान हाती घेतले आहे. यात देशात प्रथमच ‘युवकांचा जाहीरनामा’साकारण्यात येत आहे. या अंतर्गत टिकटॉक व्हिडीओ स्पर्धेचे आयोजन केले आहे. युवक-युवतींच्या मनातील नव्या महाराष्ट्राच्या विकासाच्या कल्पना, विचार व्हिडीओच्या माध्यमातून साकारल्या जाणार आहेत.

तरुणाईच्या विचारातील, कल्पनेतील नवीन महाराष्ट्र कसा असावा, हे टिकटॉक व्हिडीओद्वारे मांडायचे आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून १ मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ असावा. व्हिडीओ २० ऑगस्टपर्यंत #WakeUpMaharashtra व #TikTalk हे हॅशटॅग देऊन टिकटॉकला अपलोड करायचे आहेत.

तसेच wakeupmaharashtra2019@gmail.com या मेलवर पाठविणे बंधनकारक असलायचे सांगण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना ३ मोबाईल, ३ ब्लुटूथ स्पीकर, ३ ब्लुटूथ इअर फोन, ३ पॉवर बँक, ३ सेल्फी स्टिक मिळणार आहेत. तसेच सेलिब्रेटीसोबत जेवणाचा अनुभवही घेता येईल.

याविषयी महाराष्ट्र यवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले, ‘नव्या महाराष्ट्राच्या विकासाच्या संकल्पनेत युवकांचा सहभाग असावा, यासाठी वेक उप महाराष्ट्र हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम, चर्चासत्र, सोशल मिडीया आणि प्रत्यक्ष भेटी आणि मान्यवरांशी संवाद अशा स्वरूपात राज्यातील युवावर्गापर्यंत पोहचण्याचा आणि त्यांना या अभियानात सामील करून घेण्याचा आमचा उद्देश आहे.’

‘सध्याची तरुणाई चौफेर विचार करणारी, क्रिएटिव्ह आहे. टिकटॉक या सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर व्हिडीओतून आपली मते मांडावीत. युवकांच्या विचारातून नवीन कल्पना जाणून घ्याव्यात, यासाठी टिकटॉक कॉम्पिटेनच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ देण्याचा आमचा उद्देश आहे. या स्पर्धेत युवकांना मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि नव्या कल्पना मांडाव्यात,’ असेही आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!