सौराष्ट्रची सावध सुरुवात; लंचपर्यंत १ बाद ९९ धावा

0
नाशिक | नाशिकमध्ये आजपासून सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र रणजी सामना सुरु आहे. महाराष्ट्रने नाणेफेक जिंकल्यानंतर सौराष्ट्रला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लंचपर्यंत सौराष्ट्रच्या १ बाद ९९ धावा झाल्या आहेत.

केदार जाधव, जयदेव उनाडकट यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू नाशकात दाखल झाल्यामुळे नाशिककरांनी गोल्फ क्लब मैदानावर गर्दी केली आहे.

आज सकाळी साडेआठ वाजता रणजी सामन्याचे आकाशात फुगे सोडून उद्घाटन झाले. याप्रसंगी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नऊ वाजेच्या सुमारास नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राचा पारड्यात पडला. मात्र, नाशिकची खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असल्यामुळे महाराष्ट्ने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. साडेनऊ वाजता रणजी सामन्याचा पहिला चेंडू फेकण्यात आला. 

सौराष्ट्रने सावध सुरुवात केली. हार्दिक देसाई आणि स्नेल पटेल यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्र संघाकडून अनुप संकलेचाच्या एका आत येणाऱ्या चेंडूवर हार्दिक पायचीत झाला. हार्दिकने ९९ चेंडूंचा सामना करत ५५ धावांचे योगदान दिले.

स्नेल पटेल अजूनही मैदानावर टिकून असून त्याने ८९ चेंडूंचा सामना करत ३९ धावा काढल्या आहेत. दुपारी बारा वाजता लंच झाला यावेळी सौराष्ट्रच्या ३३ षटकांत एक बाद ९९ धावा झाल्या होत्या.

BOWLING O M R W ECON WD NB
AA Sanklecha 9 0 43 1 4.77 0 0
SM Fallah 10 3 19 0 1.90 0 0
A Palkar 6 2 16 0 2.66 0 0
RA Tripathi 3 1 3 0 1.00 0 0

 

LEAVE A REPLY

*