सिन्नरच्या अष्टपैलू मायामुळे बीसीसीआय सामन्यात महाराष्ट्राचा दणदणीत विजय

0

नाशिक ता. ४ (प्रतिनिधी) : बीसीसीआच्या वतीने औरंगाबाद येथे सुरु असलेल्या 19 वर्षा खालील महिला क्रिकेट स्पर्धेत सिन्नर,जि.नाशिकच्या माया सोनावणेने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने सौराष्ट्र संघावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

सौराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली, माया सोनावणेने 7 शतकात 5 निर्धाव षटके टाकून फक्त 2 धावात 4 गडी बाद करत भेदक गोलंदाजी केली.

त्यामुळे सौराष्ट्र संघ 31 षटकात 50 धावांमध्ये गारद झाला. उत्तरादाखल नाशिकचीच प्रियांका घोडके व माया सोनावणे यांनी 8 षटकात नाबाद 52 धावा करत विजय संपादन केला.

प्रियांका घोडके

मायाने 28 चेंडूत 20 धावा केल्या तर प्रियांका घोडके ने उत्तम फटकेबाजी करत 20 चेंडूत 30 धावा केल्या. नाशिकच्या या दोन्ही महिला खेळाडुनी आपला दबदबा निर्माण केला.

LEAVE A REPLY

*