Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

Share
राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना मिळणार नवसंजीवनी - उपमुख्यमंत्री अजित पवार; All industrial training institutes in the state will update - Deputy Chief Minister Ajit Pawar

मुंबई | प्रतिनिधी

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाकडून आज देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. २५ हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचे समजते.

या घोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने निर्देश देत पुढील पाच दिवसात गुन्हा दाखल करा असे म्हटले आहे.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून राज्य सहकारी बँकेचा उपयोग झाला असल्याचे यात म्हटले आहे. राज्य सहकारी बँकेत जवळपास २५ हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.

२००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते. हे सगळे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणी कोर्टाने अजित पवारांसह एकूण पन्नास जणांविरोधात येत्या पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचं अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कसे झाले राज्य सहकारी बँकेचं नुकसान?

  • संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केलं
  • नऊ साखर कारखान्यांना ३३१ कोटींचा कर्जपुरवठा
  • गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना ६०कोटींचे कर्ज
  • केन एग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं ११९ कोटींचा तोटा
  • २४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, २२५कोटींची थकबाकी
  • २२ कारखान्यांकडील १९५ कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित
  • लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा ३ कोटींचे नुकसान
  • कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही ४७८कोटींची थकबाकी
  • खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, ३७ कोटींचे नुकसान
  • ८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६.१२ कोटींचा तोटा
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!