Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रSSC Exam : परीक्षा घेण्याच्या मागणीवर न्यायालयाचा आता या तारखेला निर्णय

SSC Exam : परीक्षा घेण्याच्या मागणीवर न्यायालयाचा आता या तारखेला निर्णय

मुंबई

महाराष्ट्र सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहावीचा निकाल कसे लावण्यात येणार? ती प्रक्रिया जाहीर केली. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात पुणे येथील निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी (Dhananjay Kulkarni) यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी कुलकर्णी यांच्या समोरील आजची सुनावणी संपली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार म्हणजेच ३ जून रोजी होणार आहे.

- Advertisement -

दहावीची परीक्षा : निकालाबाबत समाधानी नसल्यास काय करता येईल ?

मुंबई हायकोर्टानं सुप्रीम कोर्टातील सीबीएसई परीक्षेसंदर्भातील याचिकेच्या निर्णयाच्या अनुषंगानं पुढील सुनावणी ३ जून रोजी घेण्याचं ठरवले आहे. ज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अध्यादेश काढून परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान दहावीच्या परीक्षेसंदर्भातील राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात इंटर्व्हेन्शन याचिका दाखल झाल्या आहेत. दोन वेगवेगळ्या हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानं निर्णय देण्यास हायकोर्टाने नकार दिला. एकच याचिका फक्त परीक्षा घ्या या बाजूची, जी धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केली होती. दहावीतील एक विद्यार्थी आणि दोन पालकांचा परीक्षेस नकार देणारी याचिका दाखल झाली आहे. सरकारने काढलेल्या निर्णयाला जोडून न्यायालयात अहवाल सादर करा, असे याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी यांना न्यायालयाने सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या