Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा

राज्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा

 सार्वमत

पुणे (प्रतिनिधी)  – राज्याच्या विविध भागात पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमी-अधिक प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटसह तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

27 तारखेला मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटसह पावसाचा इशारा देण्यात आला देण्यात आला आहे. तर कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.28 तारखेला विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वार्‍यासह गारांचा पाऊस पडण्याचा ईशारा देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाचा ईशारा आहे. तर कोकण गोव्यात हवामान कोरडे राहील.

29 आणि 30 तारखेला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह गारा पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाचा इशारा आहे. तर कोकण गोव्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या