Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसरकार अस्थिर करू पाहणार्‍यांच्या हाती अपयश – जयंत पाटील 

सरकार अस्थिर करू पाहणार्‍यांच्या हाती अपयश – जयंत पाटील 

सार्वमत
मुंबई – करोनाचे संकट असतानाही काही जण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या निर्णयामुळे राज्यसरकार अस्थिर करू पाहणार्‍यांच्या हाती अपयश आले आहे असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला.
महाराष्ट्रातील सरकार स्थिर होतं. स्थिर राहील आणि करोनाविरोधातील लढा आम्ही यशस्वी करूच, शिवाय राज्याची अर्थव्यवस्थाही आम्ही पुन्हा सुदृढ करू, असेही ते म्हणाले. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आयोगाला पत्र लिहून विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याची विनंती केली होती. निवडणूक आयोगाने निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर निवडून जातील आणि तेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
- Advertisment -

ताज्या बातम्या