महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे साईचरणी लीन

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शनिवारी माध्यान्ह आरतीनंतर साईसमाधीचे दर्शन घेतले. नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शनिवारी साईसमाधीचे दर्शन घेतले यावेळी संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी धनंजय निकम यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार केला.
दरम्यान अमित ठाकरे शिर्डीत आल्याचे कळताच जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला आले होते.
आगामी निवडणुकीपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अमित यांना राजकारणात उतरविणार का? अशी चर्चा राजकिय वर्तुळात असल्याने शिर्डीत काय बोलतील याकडे सर्वाचे लक्ष लागुन होते. राज्यातील राजकिय समिकरणे बदलत आहे. एकिकडे पक्षातील दिग्गजांना फोडण्याचे काम चालू असतांना दुसरीकडे मराठी व्यवसायींकाचा वाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच उचलुन धरला आहे.
त्यामुळे राज ठाकरे यांनी युवकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अशातच प्रत्येकजण पक्षपातळीवर नवनवीन नेतृत्वाला संधी देऊन नशीब अजमावण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे आगामी काळात अमित ठाकरे यांच्यावर राज ठाकरे कोणती जबाबदारी देतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
यावेळी शिर्डी नगरपंचायतचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी साईसमाधी शताब्दी सोहळा साजरा होत असुन शहरात विकास शुन्य असल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आणुन दिले.

LEAVE A REPLY

*