राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत महाराष्ट्राला ८ कांस्यपदके

'मविप्र'च्या पिंपळगाव महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा समावेश

0

पिंपळगाव | नुकत्याच कपूरथाळा (पंजाब ) येथे पंजाब राज्य कॅनोईंग अँड कयाकिंग  असोसिएशन  यांच्या वतीने  व भारतीय कॅनोईंग व कयाकिंग संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या खुल्या राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत महाराष्ट्र संघाला ८ कांस्यपदके मिळाली.

पदक विजेत्या महाराष्ट्राच्या संघात मविप्र समाजाच्या पिंपळगाव येथील क का वाघ महाविद्यालयाच्या ५ खेळाडूंचा समावेश होता.

पिंपळगाव महाविद्यालयाचे राष्ट्रीय पदक विजेते कॅनोईंग पटू  मनोज रामनाथ पुरकर, प्रदीप वाल्मिक गाजरे यांनी “सी टू”  ५०० मिटर अंतर प्रकाराच्या शर्यतीत  कांस्य  पदक प्राप्त केले. या स्पर्धेत भारतातील २२ राज्यातील संघांनी सहभाग घेतला होता.

कुणाल किशोर वाटपाडे, सनी रविंद्र सोनवणे, विशाल मदन गोडे, प्रदीप वाल्मिक गाजरे यांनी ” सी फोर  ” २००  मीटर अंतर प्रकाराच्या शर्यतीत कांस्य  पदक प्राप्त  केले .
त्यांच्या या यशाबद्दल मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सभापती अॅड नितीन ठाकरे, उपसभापती नानाजी दळवीचिटणीस डॉ. सुनिल ढिकले, संचालक मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षणाधिकारी डॉ डी. डी. काजळे, डॉ आर डी दरेकर, प्रा. एस के शिंदे, डॉ एन एस शिंदे, श्री सी डी शिंदे, प्राचार्या डॉ एस एस घुमरे, उपप्राचार्य प्रा एस.वाय.माळोदे, प्रा डी डब्ल्यू शेळके, श्री अरुण मोरे यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांना प्रा अविनाश  कदम व प्रा हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

*