Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकरोना रोखण्यासाठी आता घराघरात शोधमोहिम

करोना रोखण्यासाठी आता घराघरात शोधमोहिम

मुंबई | Mumbai –

देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तसंच रोजच्या रोज ही रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाला रोखण्याचे

- Advertisement -

आव्हान स्वीकारले असून यापुढे घरोघरी जाऊन करोना रुग्ण व त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याची राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील दस्तक योजनेच्या धर्तीवर ही योजना असून यात लोकं व लोकप्रतिनिधींनाही सहभागी करुन घेतले जाणार आहे.

मुंबईसह राज्यातील वेगवेगळी शहरे तसेच ग्रामीण भागात करोना रुग्ण वाढणे तसेच करोना पसरण्याची कारणे वेगवेगळी आहेत. यात लोकसंख्येची घनता, झोपडपट्टी, सार्वजनिक स्वच्छता गृह, चाचण्यांचे प्रमाण, रुग्ण व रुग्ण संपर्कातील लोक अशी वेगवेगळी कारण आहेत. त्याचप्रमाणे यात काही समान दुवे असून त्याचा विचार करून करोना रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम आखण्यात येणार आहे.

सप्टेंबरच्या मध्यापासून अंमलबजावणी

या योजनेत शहरी भागातील व ग्रामीण भागात पसरणारा करोना, व्यापक जनजागृती, लोक व लोकप्रतिनिधी सहभाग, कोमॉर्बीड लोकांचा, वृद्ध लोकांचा विचार, आरोग्य शिक्षण, चाचण्यांची व्यवस्था, रुग्ण आढळल्यास तात्काळ करायचे उपचार आदी वेगवेगळ्या प्रकारे विचार करून सर्वंकष योजना तयार करण्याचे काम सुरु आहे. सप्टेंबच्या मध्यावधीपासून महिनाभर ही योजना राज्यात घरोघरी राबवली जाणार आहे. याचबरोबर सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे आणि स्वच्छता पालन ही त्रिसूत्री लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून राबवली जाणार आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर दक्षता समिती स्थापन करण्यापासून आमदारांचा सहभाग तसेच शहरात नगरसेवकांना या योजनेत कशाप्रकारे सहभागी करायचे याचाही विचार सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या