Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

कॉंग्रेस नेत्यांची बैठक : विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

Share

मुंबई | प्रतिनिधी

काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुंबईत पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत घोषणा केली.

आज कॉंग्रेस आमदारांची आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली. पुढील २४ तासांत नेमके काय करायचे याबाबत मल्लिकार्जून खर्गे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावयाचे असून बहुमत सर्वांसमोर सिद्ध करावे असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवार यांच्या गोटात खळबळ उडाली असून जमवाजमव सुरु करण्यात आली आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने मिळून शिवमहाघाडी स्थापन केली आहे. याआधी शिवसेनेने विधिमंडळनेतेपदी एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांची निवड केली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!