Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

महाविकास आघाडीचा आज पहिला अर्थसंकल्प

Share

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प आज शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार सादर करीत आहेत. बेरोजगारीच्या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्पात रोजगार देणारी महत्वाकांक्षी योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच प्रामाणिक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

निवडणुकानंतर सरकार स्थापण्याबाबत अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस, काँगे्रस, शिवसेना आणि मित्र पक्षाची महाविकास आघाडी बनविण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांच्याकडे आले. अर्थमंत्री म्हणून तेच काम पाहत आहेत.
निवडणुकीत रोजगारावरून या तिनही पक्षांनी भाजपाला लक्ष्य केले होते.

त्यामुळे आता या अर्थसंकल्पात रोजगारावर भर देण्यात येणार आहे. राज्यभरातील तालुका आणि जिल्हा स्तरावर बेरोजगार युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगारच्या संधी निर्माण करून देण्यारी योजना असेल.

नगर जिल्ह्याला काय मिळणार?
आज अर्थसंकल्पा सादर होत आहे. त्यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला काय येते याबाबतची उत्सुकता आहे. सरकारने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. ज्यांनी कर्जफेड वेळेत केली त्यांना तसेच दोन लाखांवरील कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना सरकार काय दिलासा देणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. शिर्डी विमानतळ, नगर-परळी रेल्वे मार्गासाठी किती निधी दिला जातो याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!