राज्याचा दहावीचा निकाल ८९.४१ टक्के; नाशिक विभागाचा ८७.४२ टक्के निकाल

0
नाशिक | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्याआधी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी विभागवार टक्केवारी सांगितली.
त्यात संपूर्ण राज्याचा निकाल हा ८९.४१ टक्के लागला तर नाशिक विभागाचा निकाल ८७.४२ टक्के निकाल लागला आहे. नाशिक विभागातून यावर्षी दोन लाख 10 हजार 782 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. या विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजेनंतर ऑनलाईन निकालाची प्रत काढता येणार आहे.

यंदाच्या निकालातदेखील नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका आहे.  87.27 टक्के मुले दहावीत पास झाली आहेत.

कोकण विभागाने यंदा दहावी आणि बारावीत बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल तब्बल ९६ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 85.97 टक्के इतका लागला आहे.

इथे बघा निकाल :

http://www.mahresult.nic.in/

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

SMS सेवेद्वारेही 57766 या नंबरवर MHSSC<space><seat no> एसएमएस करून निकाल बघता येईल.

निकालाची विभागवार टक्केवारी

कोकण- 96

कोल्हापूर- 93.88

पुणे- 92.08

मुंबई- 90.41

औरंगाबाद- 88.81

नाशिक- 87.42

अमरावती- 86.49

लातूर- 86.30

नागपूर- 85.97

यंदाच्या निकालातील ठळक मुद्दे

 • परीक्षेच्या सूचना इंग्रजीसोबत मराठीत
 • पहिल्यांदाच उत्तरपत्रिका आणि पुरवणीच्या प्रत्येक पानावर बारकोड
 • गणित इंग्रजी विषयासाठी एबीसीडी प्रश्नसंच
 • पुणे विभागासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध
 • भाषा विषयासाठी – 20 गुणांची तोंडी परीक्षा
 • मराठी आणि इंग्रजी – प्रथम भाषा
 • 4 लाख 3 हजार 137 प्रावीण्य श्रेणी
 • 5 लाख 38 हजार 890 प्रथम श्रेणी
 • 4 लाख 14 हजार 914 द्वितीय श्रेणी
 • 99 हजार 262 उत्तीर्ण श्रेणी
 • 21 हजार 927 शाळा

LEAVE A REPLY

*