सिंचन घोटाळ्याप्रकरणी तटकरेंच्या अडचणी वाढणार; तीन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

0
मुंबई | महाराष्ट्रात गाजलेल्या कोंडणे धरण प्रकल्प गैरव्यवहार   दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाकडून बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पाच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबत विविध तक्रारी आलेल्या होत्या. त्यानंतर शासनाने कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पातील गैरव्यवहारसंदर्भात उघड चौकशीचे आदेश एसीबीला दिले होते.

त्यानंतर चौकशी पथकाची स्थापना करून सप्टेंबर २०१६ ला कोपरी पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर विशेष न्यायालयात ठाणे येथे आज दोषारोपपत्र दाखल केले आहे.

रायगड जिल्ह्यातील कोंडाने प्रकल्पातील घोटाळ्यासंदर्भात हे आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी मागील वर्षी सहा अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

मोठमोठ्या सिंचन अधिकाऱ्यांसह काही मंत्रीही या घोटाळ्यात अडकल्याचे सांगितले जात असून तत्कालील जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

LEAVE A REPLY

*