Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : मुख्यमंत्र्यांचे करणार कांदा मारून स्वागत; परिवर्तनवादी संघटना आक्रमक

Share

नाशिक । प्रतिनिधी

पावसामुळे नाशिक जिल्हयातला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतात पाय ठेवायला जागा नाही अशी अवस्था असताना चाळीत साठवलेल्या कांद्याने आधार दिला आहे. निवडणुकीत वांदा नको म्हणून सरकारने कांदा आयातीला परवानगी देऊन शेतकर्‍यांसमोरील अडचणी वाढवण्याचा घाट घातला आहे. पाकिस्तान द्वेष पसरवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने त्याच पाकिस्तानातून कांदा आयात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हि सरकारची फसवेगिरी असल्याचा आरोप परिवर्तनवादी संघटनांनी केला आहे.

सरकारनें कांदा आयात-निर्यातीबाबत स्थानिक उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अन्यथा महा जनादेश यात्रेच्या समारोप रॅलीत कांदे मारून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येईल असा इशारा या संघटनांच्या वतीने देण्यात आला आहेज्या पाकिस्तानच्या नावाने बोंबा मारत केंद्रातील सत्ता पुन्हा काबीज केली त्याच पाकिस्तानमधून कांदा आयात करून निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा होणारा उद्रेक टाळायचा घाणेरडा प्रकार सरकार करीत असल्याचा आरोप परिवर्तनवादी संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. पाकिस्तानद्वेषी सरकारला तिकडचा कांदा चालतो का असा सवाल उपस्थित करून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दरवाढीचा फायदा मिळू नये असेच सरकारला वाटत असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह भाजपचे राज्यातील मंत्रिमंडळ उद्या दि.18 नाशिकला येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून होणार्‍या कांदा आयातीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी सनदशीर मार्गाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय परिवर्तनवादी संघटनाच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन स्वीकारावे व कांदा आयात-निर्यात धोरणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह या प्रतिनिधींचा आहे. याकडे गांभीर्याने पाहीले जात नसेल तर शेतकर्‍यांच्या हिताच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. मुख्यमंत्री बुधवारी शहरातून रॅली काढणार असून त्यावेळी कांदे मारून त्यांचे स्वागत करण्यात येणार असून संबंधित कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने नियोजन देखील सुरु केले असल्याची चर्चा आहे.


शेतकरी प्रश्नांकडे गांभीर्याने बघा

पाकिस्तानच्या कांद्याला सर्व स्तरातून विरोध झाल्यावर या आयातीला नकार दिला गेला असला तरी चीनमधून येणारा कांदा पाकिस्तानचा पिकवलेला असणार आहे याकडे योगेश कापसे यांनी लक्ष वेधले आहे. आम आदमी पार्टी, प्रहार जनशक्ती, स्वाभिमानी शेतकरी, छात्रभारती यासह अन्य परिवर्तनवादी संघटना मुख्यमंत्र्यांचा निषेध करणार आहे. आम्हाला निवेदन देऊ न दिल्यास निश्चितच कांदे फेकून मारले जातील असे ते म्हणाले. आंदोलन करणार असे समजल्यावर पोलीस यंत्रणा आमच्या मागावर असून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले जात आहे. कदाचित तेथे बोलावून मुख्यमंत्री जाऊ पर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई केली जाऊ शकते असेही ते म्हणाले.


रॅलीच्या मार्गावर वृक्षतोड

मुख्यमंत्री शहरातून रॅली काढणार असल्याने त्या मार्गावरील झाडांची कत्तल करून हरित नाशिक या संकल्पनेला हरताळ फासण्यात येत आहे. महा जनादेश यात्रेसाठी मुख्यमंत्री बसच्या टपावर स्वार होणार आहेत. त्यांच्यासाठी शेकडो झाडांच्या फांद्या उतरवण्यात आल्या असून अनेक ठिकाणी तर झाडे देखील काढून टाकण्यात आली आहेत. शहराचे अशाप्रकारे विद्रूपीकरण चुकीचे आहे. शहरातून बसऐवजी छोट्या वाहनातून मुख्यमंत्र्यांनी फिरावे किंवा पायी चालून थेट जनतेत मिसळून संवाद साधला तर ते अधिक प्रभावी असेल याकडे गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे निशिकांत पगारे यांनी म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!