Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Mahabudget2019 : मालेगाव येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिक्षणव्यवस्था : अर्थमंत्री

Share

नाशिक : मुंबई येथे राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज मांडला जात आहे. यावेळी अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी मालेगाव येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिक्षणव्यवस्था राबविणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान भा जप – शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असून विधानसभेत महत्त्वाच्या घोषणा केल्या जात आहेत. यावेळी मालेगाव येथील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिक्षणव्यवथा राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न आहेत, असे ते यावेळी म्हणाले. तसेच कळवण येथील चणकापूर येथे जंगल संवर्धन करणाऱ्या १०० आदिवासी शूरांची स्मारके उभारली जाणार आहेत.

पुढील दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने लोकप्रिय घोषणा होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!