महाआघाडी : नगर, श्रीरामपूर, पारनेरात समिकरणे बदलणार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील भाजपा-शिवसेना युतीला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळेे नगर जिल्ह्यातील नगर शहर, श्रीरामपूर, पारनेर मतदारसंघात समिकरणं बदलणार आहेत. यात वरिष्ठ नेते कसा तोडगा काढतात यावर सर्वकाही अवलंबून आहे. नगर शहर विधानसभा मतदार संघातून आ. संग्राम जगताप यांनी निवडणूक लढविली होेती. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून सत्यजित तांबे निवडणुकीत उतरले होते.

या दोघांत चुरस होऊन जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. यावेळी आ. जगताप यांची जोरदार तयारी सुरू असून तांबे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पूर्वीपासूनच वर्चस्व राहिलेले आहे. पण या ठिकाणी ससाणे आणि मुरकुटे यांच्या गटातच लढत झालेली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी या जागेची मागणी केली आहे. त्यामुळे ही जागा पुन्हा काँग्रेसला दिली तर मुरकुटे आणि आदिकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. पारनेरातही पेच होणार आहे. सुजित झावरे, राहुल झावरे या दोघांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

*