करुणानिधींचे अंत्यसंस्कार मरिना बीचवर करण्यास मद्रास उच्च न्यायालयाची परवानगी

0
द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात द्रमुकचे सर्वेसर्वा आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे काळ निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मरीना बीचवर असलेल्या अण्णा स्मारकाजवळची जागा देण्यास राज्य सरकारने नकार दिला होता.

त्यानंतर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी दवाखान्यात मोठा गोंधळ केला होता. तसेच हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

अखेर आज कोर्टाकडून मरीना बीचवर जागा देण्यात मान्यता देण्यात आली आहे. करुणानिधी देशातील दिग्गज राजकारण्यातील एक नेते होते.

त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर तामिळनाडू राज्यात तसेच देशात केंद्राकडून दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज सकाळी हायकोर्टाचा निर्णय आला. मरीना बीचवर जागा देण्यात मान्य करण्यात आले त्यानंतर या वादावर पडदा पडला.

करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारासाठी देशातील अनेक दिग्गज नेते त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तमिळनाडूत दाखल झाले असून अनेकांनी अंत्यदर्शन घेतले आहे.

LEAVE A REPLY

*