Type to search

Featured हिट-चाट

निवडणूक लढणार असल्याचे वृत्त माधुरी दीक्षितने फेटाळले

Share
मुंबई – भाजपच्या तिकीटावर पुण्यातून बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे वृत्त काहीदिवसांपूर्वी समोर आले होते. पण हे वृत्त चुकीचे असल्याचा दावा माधुरीच्या प्रवक्त्यांनी केला आहे. हे वृत्त खोटे आणि निराधार असल्याचे तिच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे. माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याची काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा सुरु झाली होती. भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्यातून माधुरीला उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही बोलले जात होते. निवडणुकीच्या रिंगणात माधुरी दीक्षित उतरणार असल्याच्या बातमीमुळे पुण्यात आणि विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. पण हे वृत्त माधुरीच्या प्रवक्त्यांनी फेटाळले आहे. दरम्यान माधुरीने स्वत: यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!