#MadameTussauds : ‘मादाम तुसाँद’च्या दिल्ली शाखेचे उद्घाटन

0

दिल्लीतील क्नॉट प्लेस येथील ऐतिहासिक रिगल इमारतीमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या मादाम तुसाँद वॅक्स संग्रहालयाचे शुक्रवारी अधिकृतपणे उद्घाटन झाले.

या संग्रहालयात प्रसिद्ध खेळाडू, चित्रपट, राजकारण, संगीत अशा विविध क्षेत्रातील अनेक जगप्रसिद्ध व्यक्तींचे पुतळे आहेत.

सचिन तेंडुलकर, कपिल देव, ब्रायन लारा, भारतीय महिला बॉक्सर मेरी कोम, इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा कर्णधार डेव्हिड बेकम, उसेन बोल्ट, मिल्खा सिंह, कपिल देव, लिओनेल मेस्सी व क्रिस्टियानो रोनाल्डोचे मेणाचे पुतळे या संग्रहालयामध्ये उभारण्यात आले आहेत.

मादाम तुसाँद वॅक्स संग्रहालय हे लंडन, लास वेगास, न्यूयॉर्क, ऑरलांडो, सॅन फ्रान्सिस्को आणि हाँगकाँग येथे असणारे एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण आहे.

मादाम तुसाँदची दिल्लीमध्ये उघडण्यात आलेली ही 23 वी शाखा आहे. येथे वेगवेगळे क्षेत्रातील 50 लोकांचे पुतळे आहेत.

मायकेल जॅक्सन, सलमान खान, टॉम क्रूझ, मर्लिन मनरो, राज कपूर, रणबीर कपूर, कपिल शर्मा, अनिल कपूर, माजी राष्ट्राध्यक्ष ए.पी.जे अब्दुल कलाम, भगतसिंह, लेडी गागा, आशा भोसले, विल स्मिथ, लिओनार्डो डी काप्रीओ, माधुरी दीक्षित यांचा यामध्ये समावेश आहे.

आठवड्यातील सर्व दिवस हे संग्रहालय लोकांसाठी खुले असेल. मोठ्यांसाठी 960 रुपये आणि मुलांकरता 760 रुपये शुल्क आकारले जाईल.

LEAVE A REPLY

*