Type to search

मार्केट बझ

लक्झरी घरांच्या इन्व्हेंट्रीत घट

Share

सरलेल्या वर्षात लक्झरी म्हणजे ज्यांची किंमत दीड ते अडीच कोटी रुपयांच्या दरम्यान आहे अशा घरांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे या घरांचा साठा 12 टक्क्यांनी कमी झाला असल्याचे अनारॉक या संस्थेने म्हटले आहे. या क्षेत्रात तेजी येण्याची शक्यता असल्यामुळे सध्या कमी दरावर ही घरे उपलब्ध असल्याचा फायदा करून घेण्याचा ग्राहकांचा कल असल्याचे या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.

एक तर विकासक या घरांचे दर काही प्रमाणात कमी करीत आहेत. इतरही काही सवलती देत आहेत. या बाबी ग्राहकांना आकर्षक वाटत आहेत.गेल्या वर्षाच्या सुरुवातीला अशी न विकलेली घरे 48,300 इतकी होती ती संख्या आता 42,650 वर आली आहे. मध्यम किमतीतील म्हणजे 40 ते 80 लाखादरम्यान घरेही विकली जाऊ लागली आहेत.

अशा घरांच्या साठ्यात गेल्या वर्षी 14 टक्क्यांची घट झाली. सध्या सात मोठ्या शहरांत या घरांची संख्या 2,25,000 आहे. तर 40 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची न विकलेली 2 लाख 42 हजार घरे आहेत. कारण या गटात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात योजना सादर करण्यात आल्या. गेल्यावर्षी 1,95,300 घरांचे बांधकाम सुरू झाले. त्यात किफायतशीर वर्गाचा वाटा 40 टक्के इतका होता. सरकारने या वर्गातील घरांना अधिक चालना दिलेली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!