Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

खुशखबर : घरगुती सिलेंडर ६२ रुपयांनी स्वस्त

Share

नाशिक | प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाल्याने देशात घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल ६२.५० रुपयांची घट झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून याबाबत घोषणा करण्यात आल्यानंतर ध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

नव्या दरांमुळे १४.२ किलोच्या अनुदानित सिलिंडरचा दर आता ५७४.५० रुपये इतका असणार आहे. याबाबतची माहिती आज इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात विनाअनुदानित घरगुती सिलिंडरच्या दरात १००.५० रुपयांनी मोठी कपात केंद्र सरकारने केली होती. आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी ६२.५० रुपयांची कपात झाल्याने सुमारे एका महिन्यात सिलिंडरचे दर हे तब्बल १६३ रुपयांनी कमी झाले आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!