जिल्ह्यात पावसाची विश्रांती; धरणातील विसर्ग घटला

0

नाशिक, ता. ३१ : आज दिवसभरात नाशिक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते.

इगतपुरी वगळता इतर तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊसाची नोंद झाली. इगतपुरीत आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत ३६ मिमी. पावसाची नोंद झाली.

सुरगाणा तालुक्यात ७ मिमी. त्र्यंबकेश्वरला ४ मिमी. निफाडला ३.० मिमी, तर नाशिक, पेठ, कळवणला अवघ्या १ मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरित तालुक्यांत शून्य टक्के पावसाची नोंद झाली.

सायंकाळी पाचपर्यंत धरणातील विसर्गात घट झाली आहे. गंगापूर धरणातून सायंकाळी पाचपर्यंत १३८९, दारणातून ३९७०, कडवातून ३६०, तर होळकर पुलाखालील बंधाऱ्यातून ३५९० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते.

नाशिकच्या  गोदाघाटावरील पूर ओसरत असून म्हसोबा पटांगण परिसरात अजूनही सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

*