जनतेने भरपूर दिले, त्यात नाशिकचा मोलाचा वाटा – खा. शरद पवार

0
नाशिक : भारताचे माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्द सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाला नुकतीच नाशिकमधील सावरकरनगर येथील विश्वास लॉन्स येथे सुरुवात झाली.

लेखक अंबरिश मिश्र, निवेदक सुधीर गाडगीळ आणि सामाजिक कार्यकर्ते व दत्ता बाळ सराफ शरद पवार यांची मुलाखत घेत आहेत.

यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श होता. त्यांची भाषणे ऐकलीत. महाराष्ट्र निर्मितीत चव्हाणांनी उद्याच्या महाराष्ट्राबाबत भूमिका मांडली. हीच प्रेरणा उराशी बाळगून आजवरची वाटचाल केली आहे.

जनतेने भरपूर दिले आहे. त्यात नाशिकचा मोलाचा वाटा आहे. १४ आमदार दिले. काँग्रेसमध्ये वाढलो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीने काम केले. नेहमी स्पष्ट मते मांडली. त्याचे अनेक दुष्परिणाम झाले. बाजूला झालो.

अजूनही माझे पाय जमिनीवर असून वास्तवाचे नियमित भान ठेवले. राजकारणात व्यक्तिगत स्नेह ठेवावा, मतभेत असतातच पण महत्वाच्या ठिकाणी एकत्र यायलाच हवे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्वास बॅँक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी, कै. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, सपकाळ नॉलेज हब, सारस्वत बॅँक यांच्यावतीने या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शरद पवार यांचा सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विधानपरिषदचे सभापती दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री विनायकदादा पाटील, माजी आमदार हेमंत टाकले, आमदार दिलीप बनकर, विश्वास ठाकूर, कैलास कमोद आदी मान्यवर उपस्थित आहेत.

 

LEAVE A REPLY

*