Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अबब… नुकसानीचा आकडा सव्वा चार लाख हेक्टरवर !

Share

अकोले, पारनेर, कर्जतमध्ये 250 टक्के || तर नगर तालुक्यात 200 टक्के नुकसान

अहमदनगर (प्रतिनिधी)- सप्टेंबर महिन्यात झाले अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती आणि उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारीत जिल्ह्यात 3 लाख 65 हजार हेक्टर शेती आणि उभी पिके उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात सुरू असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात हा आकडा सव्वा चार लाखांच्या जवळपास पोहचला आहे. टक्केवारीत हा आकडा प्राथमिक अंदाजाच्या 150 टक्के आहे. यामुळे जिल्ह्यातील अवकाळीच्या तडाख्याची व्याप्ती चांगली असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख 91 हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती. यातील 2 लाख 93 हजार 14 हेक्टवरील पिकांना अवेळी आणि अतिवृष्टीचा दणका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज होता. यात 1 हजार 529 गावातील 3 लाख 84 हजार शेतकरी यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचा अंदाज कृषी विभागाचा होता. मात्र, 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पंचानाम्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यात 4 लाख 21 हजार 384 हेक्टरवर सोमवारपर्यंत नुकसान झाल्याची आकडेवारी संकलित झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 557 गावात 3 लाख 84 हजार 246 शेतकर्‍यांचे 3 लाख 65 हजार हेक्टवर नुकसान झाल्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात सोमवारपर्यंत 5 लाख 68 हजार 678 शेतकर्‍यांचे 4 लाख 21 हजार हेक्टवर क्षेत्रावर अतिवृष्टीचा तडाखा बसला असल्याचे समोर आले आहे. यात अकोले, पारनेर आणि कर्जत तालुक्यात 250 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. तर नगर तालुक्यात 212 टक्के नुकसान झालेले आहे. सर्वात कमी नुकसान हे अकोले तालुक्यात सर्वात कमी 97 टक्के झालेली आहे.

संकलित होणारी नुकसानीची आकडेवारी महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने विभागीय आयुक्त राजाराम माने यांना सादर करण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्त यांच्याकडून ही माहिती सरकार दरबारी पाठविण्यात येणार असून त्यानंतर मदतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अद्याप जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारीच अंतिम झालेली नसल्याने भरपाई कधी मिळणार याकडे शेतकर्‍यांचे डोळे लागलेले आहेत.

पंचनाम्याची अंतरिम आकडेवारी
नगर 21034 शेतकरी (18 हजार 116), पाथर्डी 76344 (59 हजार 392), पारनेर 40224 (22 हजार 216), कर्जत 34012 (25 हजार 111), श्रीगोंदा 45506 (31 हजार 648), जामखेड 9169 (4 हजार 561), श्रीरामपूर 30749 (28 हजार 548), नेवासा 56155 (45 हजार 222), शेवगाव 46523 (40 हजार 404), राहुरी 40825 (29 हजार 429), संगमनेर 49716 (31 हजार 939), अकोले 59055 (28 हजार 389), कोपरगाव 41445 (34 हजार 275), राहाता 17921 (22 हजार 131) असे आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!