लोणी : शेतकरी संघटनांची गावातून पदयात्रा

0

अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि जिल्ह्यातील साखर कारखानदार यांच्या उसाची पहिली उचल यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी बुधवारी बैठक बोलावली होती. कारखान्यांकडून पहिल्या उचलीपोटी दोन हजार 300 रुपये प्रमाणे दर देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही संघर्ष समितीला हा तोडगा मान्य झाला नाही.

साखर कारखानदारांचा 2300 रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर  शेतकरी संघर्ष समितीने आज गुरुवारपासून लोणी (ता. राहाता) येथे आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे.

नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या शेतक-यांनी विखे यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.

संगमनेर लोणी रस्त्यावर विखे यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरु करण्यात आले.

जिल्हा प्रशासनानेही लोणी येथे आंदोलन करण्यास परवानगी नाकारली होती. त्या पार्श्वभूमीवर लोणीतील आंदोलन चिघळण्याची शक्यता गृहित धरुन पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

यावेळी शेतकरी संघटनांतर्फे गावातून पदयात्रा काढण्यात आली.

LEAVE A REPLY

*