Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

लोणीत घरफोड्या करणार्‍या अनेक टोळ्या कार्यरत शिक्षकाच्या घरातून दोन लाखांची चोरी

Share
व्यापारी अहुजांना 60 हजाराला लुटले तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, Robbed Merchant Ahuja Crime News Ahmednagar

लोणी (वार्ताहर) – राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून दररोज होणार्‍या घरफोड्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकाचा बंगला फोडून चोरट्यानी चांदीची भांडी आणि सोन्याचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला.

जनाबाई ठाकूर यांच्या घरातून 13 लाखांच्या सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरी करण्यात आला होता. त्याच दिवशी दाढ रस्त्यालगतच्या लगडनगरमध्ये राहणारे रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक रमेश गुलाबराव निंबाळकर हे परगावी गेले असताना त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरातील चांदीची भांडी, आठ ग्रॅम सोन्याचे दागिने, साड्या, कपडे इत्यादी सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. शिक्षक निंबाळकर यांच्या पत्नी कर्जत येथे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत तर मुलगा पुणे येथे नोकरी करतो. त्यामुळे काही दिवस हा बंगला बंद असतो. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील प्रत्येक वस्तूची झडती घेतली.

लोणीत होत असलेल्या घरफोड्यांनी नागरिक त्रस्त झाले असून पोलिसांना भुरटे चोरही सापडत नसल्याने त्यात आणखी भर पडली आहे. चोर्‍यांची ही मालिका कधी थांबणार? असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला असून गावात एकाच वेळी अनेक ठिकाणी घरफोड्या होत असल्याने अनेक टोळ्या कार्यरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी फक्त गुन्ह्याची नोंद घेण्याचे काम न करता या टोळ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!