लंडन : मोनार्क एअरलाइन्स आजपासून बंद, 3 लाख तिकिटं रद्द

0

मोनार्क एअरलाइन्स ही ब्रिटनमधली विमान कंपनी बंद पडली असून लाखो प्रवासी विदेशामध्ये ठिकठिकाणी अडकले आहेत. त्यांना ब्रिटनमध्ये कसं आणायचं हा प्रश्न ब्रिटनच्या अधिकाऱ्यांसमोर असून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार मोनार्क एअरलाइन्सची येत्या काळातली जवळपास 3 लाख बुकिंग रद्द करण्यात आली आहेत.

इंग्लंडच्या सरकारने नागरी उड्डाण खात्याला 30 विमानांची सोय करण्यास सांगितले असून, विदेशामध्ये जिथे जिथे ब्रिटनचे नागरिक अडकले असतील त्यांना आणण्यास सांगितले आहे.

अशा प्रवाशांची संख्या 1,10,000 आहे. जीवघेण्या स्पर्धेमुळे युरोपातील विमानकंपन्यांवर प्रचंड दडपण असून कंपन्या बंद होणे किंवा एकत्र येणे यासारखे प्रकार अपेक्षित आहेत.

एअर बर्लिन व अलितालिया या कंपन्यांनी दिवाळखोरी जाहीर केली आणि उद्योगासाठी गुंतवणूकदारांचा शोध सुरू केला.

LEAVE A REPLY

*