Type to search

क्रीडा

पाकिस्तानसाठी सेमीफायनलची अवघड वाट; प्रथम फलंदाजीचा निर्णय

Share

लंडन : भारताने विश्वचषकाच्या सेमीफायनलपर्यंत पोहचला असून आज होणारा सामना महत्वाचा असणार आहे. म्हणजेच पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात होणाऱ्या सामन्यातून विश्वचषकातील चार टॉप संघ ठरणार आहेत.

या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेज जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकामध्ये बांग्लादेश टीमचे आव्हान संपुष्टात आले असले तरी, पाकिस्तानकरिता ही शेवटची संधी असणार आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं प्रवेश केल्यामुळं पाकिस्तानच्या आशा धूसर झाल्या आहेत.

दरम्यान, आठ सामन्यांत नऊ गुणांसह पाचव्या स्थानी असलेला पाकिस्तान संघाला जर न्यूझीलंडला पिछाडीवर सोडायचे असेल तर त्यांना प्रथम फलंदाजी करीत ३५० धावा कराव्या लागतील आणि बांगलादेशला ३११ धावांनी पराभूत करावे लागेल किंवा ४०० धावा फटकावत ३१६ धावांनी पराभूत करावे लागेल. त्यामुळे हा सामना पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!