भारताचा पहिला डाव १०७ ; इंग्लडची स्थिती मजबूत

0

लंडन : भारताचा पहिला डाव १०७ वर गडगडल्यानंतर आता इंग्लंडचा डाव ६६ धावांवर २ गडी बाद अशी स्थिती आहे. लॉर्ड्स मैदानावर होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला होता. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ही मॅच खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ हा पाण्यात गेल्याने क्रिकेट प्रेमींची निराशा झाली आहे.

दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पाऊस पडणार नाही. पण पाचव्या दिवशी मात्र पाऊस पडेल, असा अंदाज इंग्लंडमधल्या वेधशाळेनं वर्तवला आहे.

पहिल्या लढतीत भारताला लागला होता. विराटला कोणत्याही बॅट्समननं साथ न दिल्यामुळे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी भारतीय टीम उतरेल. पण भारतीय टीमच्या या निर्धारावर पहिल्याच दिवशी पावसानं पाणी फिरवलं आहे.

LEAVE A REPLY

*